Headlines

परदेशी हत्या प्रकरण:दुसऱ्या दिवशीही बंद, रात्री उशिरापर्यंत डीएसपी चौकात चक्का जाम‎




मुकुंदनगर परिसरात झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या मनपाच्या पथदिवे दुरुस्तीच्या ठेकेदार संस्थेचा कर्मचारी धीरज परदेशी यांच्या मृत्यूचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटले. मुख्य सूत्रधार शोधून त्याला अटक करावी, धीरजला न्याय द्यावा, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवावा या मागणीसाठी हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधीक्षक चौकात रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केले. नागरदेवळे ग्रामपंचायत प्रशासनाने आलमगीर येथे आरोपी राहत असलेल्या घरावर कारवाईची नोटीस बजावली. दरम्यान, सोमवारीही शहरात कडकडीत बंद पाळला. रात्री धीरजचा मृतदेह शहरात आणण्यात आला. रात्री उशिरा अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. धीरज परदेशी यांचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची माहिती समजताच हिंदूत्ववादी संघटनांनी शहरात फिरून शहर बंदची हाक दिली. सोमवारीही बंदची हाक दिली होती. त्याला शहर व उपनगरातून प्रतिसाद मिळाला. संपूर्ण शहर व जिल्ह्यातही कडकडीत बंद पाळला. धीरजचा मृतदेह रात्री अहिल्यानगरमध्ये आणण्यात आला. हजारो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक चौकात ठिय्या आंदोलन केले. मुख्य सूत्रधाराला शोधून अटक करावी, अशी मागणी आमदार जगताप व आमदार अक्षय कर्डिले यांनी यावेळी केली. हिंदूंच्या मालमत्ता खरेदीची चौकशीसाठी एसआयटीची मागणी काही ठराविक भागांमध्ये हिंदूंच्या जागा कशा खरेदी करण्यात आल्या, याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण आणि आमदार संग्राम जगताप करणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवावा या मागणीसाठी हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक चौकात ठिय्या िदला . छाया : सिद्धार्थ दिक्षित. आरोपींच्या घरांना संबंधित ग्रामपंचायतीमार्फत बजावण्यात आली आहे. पावसाळ्यात निवासी घरे पाडू नयेत, असेही निर्देश आहेत. सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिले आहेत, त्यानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मुदतीत कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी आंदोलकांना दिले. दोन पोलिस कर्मचाऱ्यांबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. त्याबाबत आरोपींची पोलिस कोठडी संपण्यापूर्वी चौकशी करून कारवाई केली जाईल. या गुन्ह्यात ज्यांचा संबंध असेल, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. विशेष सरकारी वकील नियुक्ती तसेच फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याबाबत पोलिस प्रशासनाकडून प्रस्ताव सादर केला जाईल, असे आश्वासन अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी आंदोलकांना दिले. ग्रामपंचायत अधिनियमानुसार बांधकाम पाडण्याची नोटीस महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ५२ हे गावातील इमारतींच्या बांधकामावर नियंत्रण ठेवण्याबाबत आहे. जर कोणी विनापरवाना किंवा नियमांचे उल्लंघन करून बांधकाम केले, तर ते पाडण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे. या कलमानुसार घराचे बांधकाम पाडण्याची नोटीस बजावली आहे. तसेच, कलम ५३ नुसार ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण केल्यास किंवा अडथळा निर्माण केल्यास, तो तत्काळ हटवण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे. या कलमानुसारही नोटीस बजावण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने घरावर नोटीस चिटकवली आहे. दोषींना सरकार सोडणार नाही : मुख्यमंत्री धीरज परदेशी यांच्या हत्येचा मी निषेध करतो. दोषींना सरकार सोडणार नाही. विशेष सरकारी वकील नियुक्त केला जाईल. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याबाबत हायकोर्टाकडे विनंती करू. आरोपींच्या घरांवर कारवाईबाबत ग्रामपंचायतीने नोटिसा बजावल्या आहेत. त्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोनवरून बोलताना सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *