Headlines

घृष्णेश्वराचे दर्शन 3 तासांऐवजी यंदा 2 तासांत:प्रथमच एमएसएफची सुरक्षा तैनात, 10 हजार स्क्वेअर फुटांचा वॉटरप्रूफ मंडप व आरोग्यसेवा



श्रावण महिन्यानिमित्त बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी होणारी मोठी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने यंदा विशेष नियोजन केले आहे. भाविकांना जलद दर्शन मिळावे यासाठी गाभाऱ्यातील अभिषेक यंदाही बंद ठेवण्यात येणा

.

विशेष म्हणजे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींनाही थेट ओळखपत्र दाखवून प्रवेश मिळणार नसून त्यासाठी मंदिर ट्रस्टने स्थापन केलेल्या स्वतंत्र पीआरओ कक्षातून पास घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा बदल येत्या शनिवारपासून (१५ ऑगस्ट) श्रावण महिन्यात लागू असणार आहे. हे नियोजन यशस्वी झाल्यास ते कायमस्वरूपी स्वीकारले जाणार आहे.

श्रावणात घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक वेरूळमध्ये दाखल होतात. गाभाऱ्यात अभिषेक सुरू राहिल्यास दर्शनाची रांग संथ होऊन प्रतीक्षा वेळ वाढतो. भाविकांना अधिक वेगाने दर्शन घेता यावे या उद्देशाने यंदाही गाभाऱ्यातील अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीही श्रावण काळात अभिषेक बंद ठेवण्यात आले होते.

1 वॉटरप्रूफ मंडप, दर्शनबारीत पाण्याची सुविधा, आरोग्यसेवा पावसापासून बचावासाठी दर्शनबारीवर १० हजार चौरस फुटांचा वॉटरप्रूफ मंडप टाकला आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे असतील. भाविकांना दर्शनरांगेत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आरोग्य पथकही (वैद्यकीय सेवा) तैनात असेल.

2 यंदा १ हजार स्क्वेअर फुटांची बॅरिकेडिंग करण्यात आली यापूर्वी दर्शनरांगेत अनेक जण मध्यस्थी करत दर्शन घेत होते (घुसखोरी करत होते). त्यामुळे रांगेतील सामान्य भाविकांना दर्शनासाठी सुमारे ३ तास प्रतीक्षा करावी लागत होती. यावर उपाय म्हणून यंदा १० हजार स्क्वेअर फुटांची बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही मार्गाने ऐनवेळी दर्शन रांगेत शिरता येणार नाही.

3 ६५ कॅमेऱ्यांची नजर; मंदिरातर्फे असतील३० स्वयंसेवक तैनात भाविकांची गर्दी, दर्शनरांगा, प्रवेश-निर्गमन मार्ग आणि संवेदनशील ठिकाणांवर ६५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच यंदा प्रथमच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २५ जवान तैनात करण्यात आले असून मंदिरातर्फे ३० स्वयंसेवकही असतील. हे पथक गर्दीच्या वेळी होणारी घुसखोरी आणि भाविकांना होणारा त्रास रोखण्याचे काम करतील.

4 नंदीमंडपात भाविकांसाठी अभिषेकाची व्यवस्था मुख्य गाभाऱ्यातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदाही मुख्य गाभाऱ्यात भाविकांना फक्त दर्शन घेता येणार आहे. तसेच ज्या भाविकांना अभिषेक करायचा आहे त्यांच्यासाठी मंदिर ट्रस्टने नंदीमंडपात स्वतंत्र व्यवस्था केली आहे. यामुळे दर्शनरांग थांबणार नाही.

5 प्रथमच व्हीआयपींसाठी स्वतंत्र पीआरओ कार्यालय आजवर अनेक जण मंदिरात दर्शनासाठी थेट ओळखपत्र दाखवून प्रवेश करत होते. यंदा ही पद्धत बंद करण्यात आली आहे. व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींसाठी भक्तनिवासाजवळ स्वतंत्र पीआरओ कार्यालय उभारण्यात येणार आहे. तेथून पास घेतल्यानंतरच त्यांना मंदिराच्या दक्षिण प्रवेशद्वारातून दर्शनासाठी सोडले जाणार आहे.

दर्शनरांगेतील घुसखोरीवर नियंत्रण मिळून भाविकांना दर्शन घेता येईल दर्शनरांगेत कुणीही घुसखोरी करणार नाही अशा पद्धतीचे यंदाचे नियोजन केले आहे. त्यामुळे भाविकांना २ तासांत दर्शन घेता येईल. या वर्षी भाविकांच्या संख्येत २० टक्के वाढ होणार आहे. -योगेश टोपरे, कार्यकारी विश्वस्त, घृष्णेश्वर मंदिर देवस्थान

सोमवारी ५० हजार, इतर वेळी २० हजार भाविकांची अपेक्षा मंदिर ट्रस्टने श्रावणी सोमवारी ५० हजारांपेक्षा अधिक, तर मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी १५ ते २० हजार भाविक येण्याचे अपेक्षित धरून त्याप्रमाणे व्यवस्था केली आहे. दररोज संध्याकाळी ९.३० वाजता रुद्राभिषेकासह महाआरती होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *