Headlines

बहुजन समाजाच्या वतीने जरांगे-पाटील यांचा सत्कार‎:‘समाजावर अन्याय झाला तर सहन करणार नाही वाटंबरेत जरांगे-पाटलांची सरकारवर जोरदार टीका



मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. समाजात फूट पाडण्याचे काम शासनाच्या यंत्रणेमार्फत सुर

.

सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे रविवारी मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा झाली. सभेला उशीर झाला असतानाही मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगोला तालुक्यात विविध ठिकाणी जरांगे-पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सांगोला शहरात आगमन होताच समर्थकांनी जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करून त्यांचे जंगी स्वागत केले. समाजासाठी संघर्ष करणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगत जरांगे-पाटील म्हणाले की, ‘माझ्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे.’ मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. कुणबी प्रमाणपत्रे रद्द करून मराठा समाजाला अडचणीत आणण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

येत्या २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे निर्णायक आंदोलन करण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली असून, या आंदोलनासाठी मराठा समाजाने एकजुटीने सज्ज राहावे, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले. ‘समाज आणि पक्ष यामध्ये प्रथम समाजाला प्राधान्य द्या,’ असे आवाहनही त्यांनी मराठा समाजबांधवांना केले. सर्व समाजा ंच्या वतीने जरांगे -पाटील यांचा सन्मान वाटंबरे येथील सभेसाठी जात असताना सांगोला शहर ासह तालुक यातील विविध ठिकाणी मनोज जरांगे -पाटील यांचे मोठ्या उत्स ाहात स्वागत करण्यात आले. त्यां ्यावर फुलांची उधळण करण्यात आली. कडलास नाका येथे मुस्लिम समा ासह विविध समाजा ंच्या प्रतिन िधींनी एकत्र येत बहुजन समाज च्या वतीने जरांगे -पाटील यांचा सत्कार केला. या वेळी विविध समाज ंतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बहुजन समाजाच्या वतीने जरांगे-पाटील यांचा सत्कार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *