Headlines

डळमळ सुरूच:नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे 3 धक्के; सर्वात मोठा 2.9 रिश्टर स्केलचा, नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे धक्क्यांचे केंद्र



नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सतत भूकंपाचे धक्के बसत असून सोमवारी (दि. १०) पुन्हा तीन धक्के बसले. सकाळपासून दुपारपर्यंत तीन वेळा भूकंपाची नोंद झाली. यातील सर्वाधिक तीव्रता २.९ रिश्टर इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या नोंदीनुसार तिन्ही

.

सोमवारी सकाळी ७.५३ वाजता २.९ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. त्याची खोली ६ किमी होती. त्यानंतर सकाळी ९.५० वा. २.७ रिश्टरचा धक्का नोंदला गेला. या भूकंपाची खोली ७ किमी होती. दुपारी २.३८ वा. २.० रिश्टरचा तिसरा धक्का बसला. त्याची खोली ५ किमी होती. तिन्ही भूकंपांचे केंद्र नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात असल्याचे समोर आले आहे.

सुरगाणा, दिंडोरीजवळ केंद्र

नाशिक जिल्ह्यात २१ जुलैपासून भूकंपाचे सातत्याने सौम्य धक्के नोंदवले जात आहेत. सुरगाणा, दिंडोरी परिसराच्या पट्ट्यात या धक्क्यांची केंद्रे आढळून आली आहेत. बहुतांश भूकंपांची तीव्रता २ ते ४ रिश्टरच्या आसपास आहे.

सकाळी ९.५० वा. २.७ रिश्टरचा धक्का नोंदला गेला. या भूकंपाची खोली ७ किमी होती. दुपारी २.३८ वा. २.० रिश्टरचा तिसरा धक्का बसला. त्याची खोली ५ किमी होती. तिन्ही भूकंपांचे केंद्र नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात असल्याचे समोर आले आहे.

धक्क्यांची मालिका २१ जुलै : भूकंपाचा धक्का २५ जुलै : सौम्य भूकंपाची नोंद २६ जुलै : भूकंपाचा धक्का २९ जुलै : भूकंपाची नोंद ३१ जुलै : ३ रिश्टरपेक्षा तीव्र ६ ऑगस्ट : भूकंपाचे धक्के ९ ऑगस्ट : ३.१ व २.९ रिश्टर १० ऑगस्ट : २.९, २.७ आणि २.० रिश्टर क्षमतेचे तीन धक्के.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *