Headlines

Maharashtra Taxi Rickshaw Drivers: Marathi Language Mandatory


महाराष्ट्रात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या सर्व व्यावसायिक प्रवासी वाहनांच्या (रिक्षा, टॅक्सी, ॲप-आधारित कॅब) चालकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. प्रवाशांशी प्रभावीपणे संवाद साधता यावा, यासाठी या सर्व चालकांना आत

.

राज्य शासनाने ‘महाराष्ट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, 2026’ची अधिसूचना जारी करून 1989च्या मूळ नियमांमध्ये हे मोठे बदल केले आहेत.

नव्या सुधारित नियमांमधील महत्त्वाचे बदल

१. नियम ४: मराठीचे कार्यकारी ज्ञान अनिवार्य

महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४ च्या उपनियम (४) मध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, व्यावसायिक वाहन चालविण्याच्या अधिकृततेसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे आवश्यक पात्रतेसोबतच “मराठी भाषेचे कार्यकारी किंवा व्यावहारिक ज्ञान” (Working knowledge of Marathi language) असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

२. ॲप-आधारित कॅब चालकांसाठी स्वतंत्र तरतूद (नियम २२)

सर्वाधिक तक्रारी येणाऱ्या ॲप-आधारित इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या मोटार कॅबच्या (Ola, Uber इ.) चालकांसाठी नियम २२(३ए) नुसार स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. अशा कॅब चालकाला मराठीचे व्यावहारिक ज्ञान असणे बंधनकारक राहील.

३. नियमभंग केल्यास थेट कारवाई!

चालकाकडे आवश्यक मराठी भाषेचे ज्ञान नसल्याचे निदर्शनास आल्यास, परवाना प्राधिकरणाला (RTO) लेखी कारणे नोंदवून कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत:

(अ) निलंबन: पहिल्या टप्प्यात चालकाच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील संबंधित अधिकृतता जास्तीत जास्त ३ महिन्यांपर्यंत निलंबित करता येईल.

(ब) परवाना रद्द: यानंतरही संबंधित चालकाकडून नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्यास, त्याचा परवाना कायमचा रद्द (Cancel) करता येईल.

४. केवळ चालकांनाच नव्हे, तर ‘परमिटधारकांनाही’ मराठी सक्तीची (नियम ७८ व ८५)

हा नियम केवळ गाड्या चालवणाऱ्या चालकांपुरता मर्यादित नाही. नियम ७८ मध्ये नवीन खंड (d) समाविष्ट करून, परमिटधारकाकडेही (Permit Holder) मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच, नियम ८५ नुसार ॲप-आधारित मोटार कॅबच्या परमिटचे नूतनीकरण (Renewal) करतानादेखील परमिटधारकाकडे मराठीचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य राहणार आहे. हे ज्ञान आरटीओ (RTO) प्राधिकरणाच्या समाधानकारक पातळीवर असणे आवश्यक असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

नियमातील संदिग्धता दूर, अंमलबजावणी प्रभावी होणार

यापूर्वीच्या नियमांमधील काही कायदेशीर त्रुटी आणि संदिग्धतेचा फायदा घेत अनेक अमराठी चालक मराठी भाषा बोलण्याबाबत टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे येत होत्या. त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या त्रुटी दूर करून कायदा अधिक कठोर आणि स्पष्ट करण्याच्या सूचना विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार हे बदल करण्यात आले आहेत.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक काय म्हणाले?

“या नवीन सुधारणांमुळे नियमांमधील जुनी संदिग्धता कायमची दूर झाली आहे. प्रवाशांशी नीट संवाद साधणे, त्यांचे म्हणणे आणि पत्ता समजून घेणे, आणि सुरक्षित व सुलभ प्रवास सुनिश्चित करणे यासाठी चालकांना स्थानिक भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. आता या सुधारित नियमांमुळे भविष्यात याची अधिक परिणामकारकपणे अंमलबजावणी करणे शक्य होईल.”

राज्य सरकारच्या या नव्या निर्णयामुळे महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्ये व्यावसायिक वाहने चालवणाऱ्या अमराठी चालकांना आता मराठी शिकावीच लागणार आहे, अन्यथा त्यांचा रोजगार धोक्यात येऊ शकतो.

हेही वाचा…

आनंदाने खा-प्या, पण जास्त गटार-बिटारात लोळू नका!:भरत गोगावलेंचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला, व्हिडिओ व्हायरल

सण-उत्सवांच्या काळात राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला नेहमीच भरभरून शुभेच्छा देत असतात. मात्र, राज्याच्या महायुती सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावले यांनी अमावस्येच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना दिलेल्या एका अजब सल्ल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. “१२ तारखेला गटारी आहे, आनंदाने खा-प्या, पण जास्त कुणी गटार-बिटारात लोळू नका,” असा सल्ला गोगावले यांनी दिला आहे. त्यांच्या या मिश्कील भाषणाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.