![]()
मुंबईलगतच्या मिरारोड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 14 वर्षांच्या एका शाळकरी मुलीचा अश्लील व्हिडिओ काढून, तो समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत सहा नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी काशिमिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन आरोपींना गजाआड केले आहे, तर उर्वरित चार फरार आरोपींचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी नववीच्या वर्गात शिकत असून ती तिच्या आईसोबत मिरारोड परिसरात राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात एका 25 वर्षीय आरोपीने ती घरात एकटी असताना तिचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ शूटिंग केले. त्यानंतर हा व्हिडिओ इंटरनेटवर टाकू, अशी धमकी देऊन त्याने पहिल्यांदा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मात्र, हे विकृत कृत्य इथेच थांबले नाही. मुख्य आरोपीने हा व्हिडिओ त्याच्या 26 आणि 28 वर्षे वयांच्या दोन मित्रांना पाठवला. या दोघांनीही व्हिडिओच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. सहा नराधमांकडून अत्याचार त्यानंतर हा व्हिडिओ आणखी तीन आरोपींच्या हाती लागला आणि त्यांनीही पीडितेला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. अल्पवयीन मुलीने संपूर्ण आपबिती कुटुंबीयांना सांगितल्यानंतर हे संतापजनक प्रकरण उजेडात आले. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून काशिमिरा पोलिसांनी 25 ते 28 वर्षे वयोगटातील सहाही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता, पोक्सो, कायदा आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. दोघांना अटक; 4 आरोपी फरार या प्रकरणाची माहिती देताना परिमंडळ 1 चे पोलिस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी सांगितले की, लगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपींनी हे कृत्य केले आहे. आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. उर्वरित चार फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्यांनाही अटक केली जाईल. हे ही वृत्त वाचा
पालघर हादरले!:तलासरीत 19 वर्षीय तरुणीवर सहा जणांकडून सामूहिक अत्याचार; तिघांना बेड्या, इतर तिघांचा शोध सुरू
राज्यातील महिलांवर तसेच तरुणींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे एका धक्कादायक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणीवर सहा जणांनी मिळून सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष घटनेमुळे पालघर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. वाचा सविस्तर
Source link