![]()
हिंगोली शहरातील जुन्या जिल्हा परिषद इमारतीसमोर असलेल्या आणि मुगाच्या भज्यांसाठी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या ‘महाराज भजीयेवाले’ हॉटेलचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने रद्द केला आहे. हॉटेलमधील कमालीची अस्वच्छता आणि खाद्यपदार्थांमधील निष्काळजीपणा उघडकीस आल्यानंतर मंगळवारी (11 ऑगस्ट) ही कारवाई करून हॉटेल पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. खिचडीत आढळल्या आळ्या; व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ ‘महाराज भजीयेवाले’ हे हॉटेल हिंगोलीत खिचडी आणि मुगाच्या भज्यांसाठी खवय्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. दररोज शेकडो नागरिक आणि ग्रामीण भागातून येणारे ग्रामस्थ येथे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. दरम्यान, भाजपच्या पदाधिकारी प्रीती जैस्वाल यांनी या हॉटेलमधून खिचडी मागवली असता, त्यात दोन आळ्या आढळून आल्या होत्या. त्यांनी या अस्वच्छ आणि कीड लागलेल्या खिचडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून तीव्र संताप व्यक्त केला. तसेच याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि अन्न व औषध प्रशासनाकडे थेट तक्रार नोंदवली होती. एफडीएच्या पथकाकडून धाड; अस्वच्छता उघड तक्रारीची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी हॉटेलवर अचानक धाड टाकून तपासणी केली. या कारवाईत: सहाय्यक आयुक्त पवन खताळ, अन्न सुरक्षा अधिकारी राजश्री सावंत आणि लोंढे यांच्या पथकाने पाहणी केली. या कठोर कारवाईमुळे शहरातील इतर हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.
हिंगोलीतील परवाना रद्दची पहिलीच कारवाई अन्न व औषध प्रशासनाने हिंगोली शहरात परवाना रद्द करण्याची केलेली ही बहुधा पहिलीच मोठी कारवाई ठरली आहे. आतापर्यंत केवळ नावालाच पाहणी केली जात असल्याने एफडीएच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, या धडक कारवाईमुळे निष्काळजीपणा करणाऱ्या व्यावसायिकांना मोठा इशारा मिळाला असून, शहरातील अस्वच्छ कारभारावर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Source link
हिंगोलीत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई:'महाराज भजीवाले' हॉटेलचा परवाना रद्द, अस्वच्छतेमुळे हॉटेल सील