Headlines

'Gen Alpha' आता प्रश्न विचारतेय, सत्तेला उत्तर द्यावेच लागेल!:कुठे बाटलीचा माइक, तर कुठे 'शिक्षक द्या'ची मागणी; मुलांचे व्हिडिओ शेअर करत वडेट्टीवार कडाडले




आजची नवी पिढी आता थेट व्यवस्थेला प्रश्न विचारू लागली आहे. त्यांना हिंदू-मुस्लिम द्वेष किंवा भावनिक राजकारण नकोय, तर त्यांना चांगले रस्ते आणि शाळेत शिक्षक हवे आहेत,” अशा शब्दांत राज्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर विद्यार्थ्यांचे व्हिडिओ शेअर करत त्यांनी सरकारला टीका केली आहे. विद्यार्थ्यांचे व्हिडिओ शेअर करत मांडली परिस्थिती विजय वडेट्टीवार यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर पोस्ट करत राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या वाढत्या जागरूकतेकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी पोस्टमध्ये राज्यातील चार प्रमुख उदाहरणे दिली आहेत: नाशिक (त्र्यंबकेश्वर-पेगलवाडी, गोहिरेवाडी): येथील विद्यार्थ्यांनी पाण्याच्या बाटलीचा माईक बनवून रस्त्यांच्या दुरवस्थेचे अनोख्या पद्धतीने रिपोर्टिंग केले. रायगड (कोंडिवडे): येथील दोन विद्यार्थिनींनीही नाशिकच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच प्रयोग करून गावातील रस्त्यांचे प्रश्न मांडले. नागपूर (ग्रामीण): शाळेत जाण्यासाठी एसटी बस सुरू करा, अशी आक्रमक मागणी करत विद्यार्थिनी थेट पुढे आल्या आहेत. हिंगोली (वसमत): “आमचा सत्कार करण्यापेक्षा आम्हाला शाळेत शिक्षक द्या,” असे हिंगोलीच्या शिक्षणाधिकाऱ्यांना ठणकावून सांगणाऱ्या मुलींनी व्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत. वडेट्टीवार यांनी या घटनेचा व्हिडिओ विशेषत्वाने शेअर केला आहे. ‘ही केवळ आंदोलने नाहीत, नवी जनजागृती’ या घटनांचा संदर्भ देत वडेट्टीवार म्हणाले की, “ही केवळ मुलांची छोटी-मोठी आंदोलने नाहीत, तर ही नव्या पिढीची जनजागृती आहे. या Gen Alpha पिढीला ट्रोलिंग नको, हिंदू-मुस्लिम द्वेष नको, धमक्या आणि दंडेलशाही नकोय. त्यांना चांगले रस्ते, शाळेत शिक्षक, सुरक्षित प्रवास, दर्जेदार शिक्षण आणि मूलभूत सुविधा हव्या आहेत.” ‘मुद्द्यांवर बोला, भावनिक राजकारण थांबवा’ सरकारला थेट इशारा देताना वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने आता ठरवावे की त्यांना खऱ्या मुद्द्यांवर बोलायचे आहे की मुद्दे टाळण्यासाठी समाजाला केवळ भावनिक वादात अडकवून ठेवायचे आहे? कारण ही पिढी आता प्रश्न विचारायला शिकतेय आणि ती सत्तेकडे उत्तर मागतेय. जर या मुलांच्या प्रश्नांकडे आता दुर्लक्ष केले, तर उद्या हीच पिढी मतपेटीतून सरसकट उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला. “द्वेषाच्या राजकारणापेक्षा विकासाचे राजकारण करा. या मुलांना गृहीत धरू नका, त्यांच्या शिक्षणाकडे आणि नागरी सुविधांकडे लक्ष द्या,” असा सल्ला विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला दिला आहे. हेही वाचा.. शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा लढा अटळ: 21 तारखेला सांगलीत विराट मोर्चा, जयंत पाटील आणि राजू शेट्टींचा सरकारवर घणाघात राज्य सरकारच्या नियोजित ‘शक्तिपीठ महामार्गा’ला होणारा विरोध आता अधिक तीव्र झाला आहे. या प्रकल्पाविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून, सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी येत्या २१ तारखेला सांगलीत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *