Headlines

हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!:वसमत हळद संशोधन केंद्र आणि लखनऊच्या केंद्रीय संस्थेदरम्यान ऐतिहासिक सामंजस्य करार




वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचा उत्तरप्रदेशातील लखनऊ येथील केंद्रीय औषधी आणि सुंगधी वनस्पती संस्थेसोबत सामंजस्य करार झाला असून त्यामुळे आता आधुनिक तंत्रज्ञानाची देवाण घेवाण होणार आहे. महाराष्ट्र राज्यासह भारतातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि हळदीला वैज्ञानिक व औद्योगिक च्या माध्यमातून जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे बोलले जात आहे. केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून हा करार झाला आहे. उत्तरप्रदेशातील लखनऊ येथील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अंतर्गत केंद्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्थेच्या वार्षिक सोहळ्यानिमित्त हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या पथकाने बुधवारी ता. १२ भेट दिली आहे. यावेळी त्या ठिकाणचे तंत्रज्ञान, प्रक्रिया यासह इतर बाबींची माहिती घेण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमंत पाटील, वैज्ञानिक पद्मश्री प्रा. अनिलकुमार गुप्ता, वैज्ञानिक शंकर नारायणन, डॉ. राजेश वर्मा, सी- मॅप लखनऊ संचालक डॉ. प्रबोधकुमार त्रिवेदी, वरिष्ठ वैज्ञानिक तथा विभाग प्रमुख डॉ. आर श्रीनिवास्तव, डॉ. ऋषिकेश भिसे, डॉ. महेश कदम, तसेच हळद संशोधन केंद्राचे संशोधक सहयोगी डॉ. अनिकेत पाटील, प्रसाद गंगाखेडकर, राष्ट्रपाल सरोदे यांची उपस्थिती होती. तसेच लखनऊच्या संस्थेचे मुख्य वैज्ञानिक डॉ. सुदीप टंडन, डॉ. राम स्वरूप वर्मा, डॉ. आर पी बंसल, डॉ.प्रियंका सिंग, अभिषेक सिंग, डॉक्टर रजनी गौतम, डॉक्टर आकांक्षा सिंग, डॉ. रमेश श्रीवास्तव यांच्याशी संवाद साधला. यानंतर दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार झाला. या करारामुळे दोन्ही संस्थांमधील वैज्ञानिक कौशल्य, प्रयोगशाळा आणि संशोधन साधनांची देवाणघेवाण, अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून शेतकऱ्यांची उत्पादकता दुपटीने वाढवणे. लागवड खर्च कमी करणे, काढणी पश्चात योग्य तंत्रज्ञानाचा अवलंब, हळदीमधील कुरकुमीनचे प्रमाण वाढवणे, औषधी, सौंदर्यप्रसाधने व अन्न प्रक्रियेसाठी नवीन उत्पादने तयार करणे. जागतिक बाजारपेठेच्या निकषावर निर्यातीसाठी चालना देणे. यासह इतरही महत्त्वपूर्ण प्रक्रिया उद्योगाबाबत संयुक्तपणे काम केले जाणार आहे. या करारामुळे मराठवाड्यातील हळद क्षेत्राला एक नवी दिशा मिळणार असून शेतकरी व कृषी क्षेत्रातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *