Headlines

हाय-हॅलो नको,थेट ‘तो’ प्रश्न विचार…लव्ह गुरूच्या टिप्स अन् मुली जाळ्यात:अयानला एकाला शिकवल्या मुलींना जाळ्यात ओढण्याच्या क्लृप्त्या




मित्रांमध्ये फुशारकी मिरवण्यासाठी अधिकाधिक मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचे, त्यानंतर त्यांच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन करायचे आणि त्याचे व्हिडिओ काढायचे, अशा प्रकाराचा उलगडा परतवाड्यात झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अयान अहमद तन्वीर अहमद याला अटक केली आहे. अयानचा एक “लव्ह गुरू’ होता. त्याने त्याला मुलींना जाळ्यात ओढण्याच्या काही क्लृप्त्या शिकवल्या. “मुलींना पटवण्यासाठी “हाय-हॅलो’ असे जनरल मेसेज करायचे नाहीत. त्यांना असा प्रश्न विचार, ज्याचे उत्तर द्यायला त्या भाग पडतील,” उदाहरणादाखल, “आप वहीं हो ना जो वहां मिले थे?” अशा प्रकारचे प्रश्न विचारून अयान मुलींना आपल्यासोबत चॅटिंग करण्यास भाग पाडत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आल्याचे सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणात अयानने एकूण आठ मुलींसोबत गैरवर्तन केले असून त्यातील दोघींवर लैंगिक अत्याचार केल्याचेही समोर आले आहे. लैंगिक अत्याचारासाठी त्याने अमरावती शहरातील एका मित्राच्या फ्लॅटचा वापर केला. गेल्या वर्षभरात तो सात ते आठ वेळा मुलींना त्या ठिकाणी घेऊन गेल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणात अयानला फ्लॅट उपलब्ध करून देणाऱ्या मानव सुगंधे यालादेखील पोलिसांनी गुरुवारी (16 एप्रिल) अटक केली आहे. मानव सुगंधे आणि अयान यांची थेट ओळख नव्हती. पीयूष नावाच्या एका तरुणाच्या माध्यमातून अयान हा मानवच्या संपर्कात आला होता. पीयूष आणि मानव पूर्वी संबंधित फ्लॅटवर रूम पार्टनर म्हणून राहत होते. मात्र काही काळानंतर पीयूषने तो फ्लॅट सोडला होता. पीयूषची अयानसोबत आधीपासून ओळख असल्याने, जेव्हा अयानने फ्लॅटबाबत विचारणा केली, तेव्हा पीयूषने त्याला मानवशी संपर्क साधण्यास सांगितले. यानंतर अयान मानवच्या संपर्कात आला. प्रत्येक वेळी 500 रुपये देऊन तो फ्लॅटमधील खोलीचा वापर या कृत्यांसाठी करत होता. भाजप नेत्या नवनीत राणा यांना दंगली घडवायच्यात : प्यारे खान नागपूर |अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. नवनीत राणा यांना दंगली घडवायच्या असून त्यांनी पसरवलेल्या अफवांमुळे त्यांच्यावर पोक्सोअंतर्गत कारवाई करण्याची मागणी होत असल्याचे खान यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, नवनीत राणा यांनी या प्रकरणातील आरोपींचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली होती. त्याला प्यारे खान यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. परतवाड्यात 3 कॅफेमध्येही चाळे अयानने काही मुलींसोबत अमरावती शहरातील दोन कॅफे आणि परतवाडा येथील तीन कॅफेमध्येही अश्लील वर्तन केले होते. पोलिस आता या पाचही कॅफेंचा शोध घेत आहेत. त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी आपली चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक केली आहे. पोलिस कोठडीत त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. तपासाअंती आरोपींच्या संख्येत आणखी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोन साखळ्या अटक केलेल्या आठ आरोपींपैकी अयान हा मुख्य सूत्रधार आहे. मानव सुगंधे हा फ्लॅट उपलब्ध करून देणारा आहे. उर्वरित सहा आरोपी आक्षेपार्ह व्हिडिओ एकाकडून दुसऱ्याला व्हायरल करणारे आहेत. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोन साखळ्या पोलिसांनी समोर आणल्या आहेत. पहिल्या साखळीत अयानकडून सर्वप्रथम त्याचा जिवलग मित्र उजेर खान याने व्हिडिओ मिळवले. ते पुढे मो. साद याला पाठवले. मो. सादने ते तरबेज खानला पाठवले. दुसरी साखळी अशी आहे. उजेर खानने ऐफाज खानला पाठवले. ऐफाजने मोहंमद इम्रानला पाठवले. त्याने शेख नावेदला पाठवले. ही साखळी अद्याप संपलेली नाही. अमरावतीतील व्हिडिओ कांड अयानला फ्लॅट उपलब्ध करून देणाऱ्या मानव सुगंधे यालादेखील पोलिसांनी गुरुवारी (16 एप्रिल) अटक केली आहे. मानव सुगंधे आणि अयान यांची थेट ओळख नव्हती. पीयूष नावाच्या एका तरुणाच्या माध्यमातून अयान हा मानवच्या संपर्कात आला होता. पीयूष आणि मानव पूर्वी संबंधित फ्लॅटवर रूम पार्टनर म्हणून राहत होते. मात्र काही काळानंतर पीयूषने तो फ्लॅट सोडला होता. पीयूषची अयानसोबत आधीपासून ओळख असल्याने, जेव्हा अयानने फ्लॅटबाबत विचारणा केली, तेव्हा पीयूषने त्याला मानवशी संपर्क साधण्यास सांगितले. यानंतर अयान मानवच्या संपर्कात आला. प्रत्येक वेळी 500 रुपये देऊन तो फ्लॅटमधील खोलीचा वापर या कृत्यांसाठी करत होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *