- Marathi News
- National
- Chardham Yatra Starts Today; Vehicles Banned From 10 Pm To 4 Am, Gangotri Yamunotri Gates To Open Tomorrow
मनमीत | डेहराडून1 मिनिटापूर्वी
- कॉपी लिंक

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेची शनिवारपासून विधिवत सुरुवात होईल. ऋषिकेशमध्ये मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यमुनोत्री आणि गंगोत्री धामासाठी १० बस रवाना करतील. हे प्रवासी १९ एप्रिल रोजी यमुनोत्री-गंगोत्रीचे कपाट उघडण्याचे साक्षीदार ठरतील. चारधामसाठी आतापर्यंत १७.८७ लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी २३ लाख भाविकांनी नोंदणी केली होती.
गुरुवारपासून ऋषिकेश, हरिद्वारमध्ये ऑफलाइन नोंदणी काउंटरही सुरू झाले. सर्वात आधी मध्य प्रदेशातील (शहडोल) १०० प्रवाशांनी नोंदणी केली. हे सर्व भाविक यमुनोत्री व गंगोत्रीचे दर्शन घेतील. केदारनाथचे कपाट २२ एप्रिलला आणि बद्रीनाथचे कपाट २३ एप्रिलला उघडेल. सध्या फक्त केदारनाथच्या पायी मार्गावर लिंचोलीच्या वर बर्फ असेल. येथे हिमनदी कापून रस्ता तयार केला आहे. मात्र डोंगरावर ३ ते ४ फूट बर्फ साचलेला आहे.
हरिद्वारपासून चारधाम यात्रा : एकूण अंतर १,६०० किमी
यात्रा मार्ग रस्ते मार्ग पायी ट्रॅक (येणे-जाणे) हरिद्वार ते यमुनोत्री 235 किमी 5 किमी (जानकी चट्टीपासून) यमुनोत्री ते गंगोत्री 225 किमी – गंगोत्री ते केदारनाथ 330 किमी 16 किमी (गौरीकुंडपासून) केदारनाथ ते बद्रीनाथ 220 किमी – बद्रीनाथ ते परत हरिद्वार 300 किमी –
बिगर हिंदूंना बंदी, भाविकांना पंचगव्य आचमन करावे लागेल
- बद्रीनाथ-केदारनाथ मंदिरात बिगर हिंदूंच्या प्रवेशावर बंदी असेल. हिंदू, बौद्ध, शीख, जैन धर्माचे लोक दर्शन घेऊ शकतील. मात्र, इतर धर्माच्या लोकांना कसे रोखले जाईल याबाबत मंदिर समितीने स्पष्ट निर्देश जारी केलेले नाहीत. दुसरीकडे, गंगोत्री-यमुनोत्रीमध्ये प्रवेश करताना भाविकांना पंचगव्याचे आचमन करवले जाईल.
- केदारनाथच्या गाभाऱ्यात भाविकांना गंगाजल, फुले अर्पण करता येणार नाहीत. मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी म्हणाले, विशेष पूजा दुपारी नसेल. त्या रात्री ११ ते पहाटे ४ या वेळेत असेल.
- यात्रा मार्गावर वाहने पहाटे ४ ते रात्री १० वाजेपर्यंत चालू शकतील. त्यानंतर चेकपोस्टवर थांबवले जाईल. यात्रा मार्गाचे १६ सुपर झोनमध्ये विभाजन करून ५४ हजार गाड्यांसाठी ११८ पार्किंग तयार करण्यात आली आहेत.
- केदारनाथमध्ये पायी यात्रेपूर्वी वृद्ध आणि बीपीचे रुग्ण गौरीकुंड येथे तपासणी करू शकतील.
- ४८ हॉल्टिंग पॉइंट बनवण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या स्थितीत येथे १.१८ लाख लोक थांबू शकतात.
मंदिर परिसरात रील बनवण्यावर बंदी
चारही धामांमध्ये गर्दीच्या दिवसांत मोबाइलवर व्हिडिओ आणि रील बनवणाऱ्यांना रोखले जाईल. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने मंदिर परिसरात रील बनवणे, व्हिडिओग्राफी करणे आणि मोबाइल फोनच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचा दावा केला आहे.