Headlines

हनुमाननगर गोळीबारप्रकरणी दोन्ही गँगच्या 8 गुंडांना बेड्या:दिवेकर-रांजणे गँगचा राडा; पोलिसांनी मुसक्या आवळल्या




हनुमाननगर चौकात हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या दिवेकर आणि रांजणे गँगच्या ८ गुंडांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी (१६ एप्रिल) रात्री झालेल्या या राड्यानंतर पोलिस त्यांच्या मागावर होते. या कारवाईत एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. सार्वजनिक कार्यक्रमातील जुन्या वादातून या दोन्ही गँगमध्ये धुसफूस सुरू होती. गुरुवारी दुपारी न्यायनगर भागात त्यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर रात्री दोन्ही गट हनुमाननगर चौकात आमने-सामने आले. या वेळी पवन दिवेकर याने हवेत गोळीबार केल्याने परिसरात खळबळ माजली होती. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेत घटनास्थळावरून एक काडतूस जप्त केले होते. अटकेतील आरोपींची नावे पवन अनिल दिवेकर (३०, रा. एमएसईबी क्वार्टर, मिल कॉर्नर), कुणाल किशोर साळवे (२६, रा. न्यायनगर, गारखेडा), महेश गौतम साळवे (३०, रा. संसारनगर, क्रांती चौक), रोहन अनिल दिवेकर (२४, रा. एमएसईबी क्वार्टर, मिल कॉर्नर), सतीश अण्णाराव हिवराळे (२३, रा. समतानगर, क्रांती चौक), सिद्धार्थ शाहू चाबुकस्वार (२१, रा. न्यायनगर, गारखेडा), नीलेश ऊर्फ सूर्या नारायण रांजणे (रा. न्यायनगर), आकाश साळुंखे (रा. हनुमाननगर) दुसऱ्या गुंडाकडून पैसे घेऊन चहा पीत असताना पोलिसांच्या बेड्या दिवेकर रात्रभर शहरातील कुख्यात गुंडच्या संपर्कात होता. तो शहराच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या ठिकाणावर तो असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. मात्र तो सातत्यने आपले लोकेशन बदलत होता. त्याने बाबा पेट्रोल पंप परिसरात राहणाऱ्या एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीकडून पुढे पळून जाण्यासाठी पैसे घेतले. त्यानंतर पहाटे पैठण गेट भागातील एका टपरीवर तो चहा पिताना पोलिसांना दिसला. साध्या वेशातील पोलिस ओळखून दिवेकर याने लागलीच पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा पाठलाग करून अखेर अर्जून राऊत यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *