Headlines

‘अनामवीरा’ आंतरशालेय समूहगीत गायन स्पर्धेत बाल शिवाजी प्राथमिक शाळेचे यश:‘ब’ गटात समूहगीत गायनात द्वितीय, ‘अ’ गटात वैयक्तिक गायनात स्वराज थोडगेचा प्रथम‎



ब्राह्मण सभा संचालित येथील जठार पेठेतील बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आंतरशालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या नावात मानाचा तुरा खोवला आहे.

.

स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या वतीने आयोजित ‘अनामवीरा’ या देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ‘ब’ गटातून सहभाग नोंदवला होता. आपल्या सुरेल आणि तालबद्ध सादरीकरणाने या समूहाने स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच ‘अ’ गटातील वैयक्तिक गायन स्पर्धेत के. जी.-२ च्या स्वराज समीर थोडगे याने उत्कृष्ट गायन करत प्रथम क्रमांक मिळवला. सरोज जोशी यांनी हार्मोनियमवर साथसंगत केली, तर पुरुषोत्तम कोरान्ने आणि शाळेचा विद्यार्थी समर्थ विजय ढोरे यांनी तबल्यावर साथ दिली. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव, सचिव मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्या अनघा देव, शाळा समिती सदस्य, मुख्याध्यापिका संगीता जळमकर, किर्ती चोपडे यांच्यासह सर्व शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

‘ब’ गटातील समूहगीत गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मधुरा राजेश भोंडे, आर्या अभिजित शेगावकर, पलक मिलिंद लांडे, ओजस्वी पराग देशमुख, स्वरा प्रफुल्ल वरोकार, शांभवी अभिषेक सोनगावकर, आनंदी अनिल कुलकर्णी आणि भार्गव अनिल भगत यांचा समावेश होता.

बालकलाकारांची साथ या स्पर्धेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गायनाने परीक्षकांची मने जिंकलीच, शिवाय शाळेचा विद्यार्थी समर्थ विजय ढोरे याने तबल्यावर दिलेली साथ आणि के.जी.-२ मधील चिमुकल्या स्वराज थोडगे याने वैयक्तिक गायनात पटकावलेला प्रथम क्रमांक या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *