![]()
दक्षिण भारतातील सर्वात मोठी मानली जाणारी राजेश्वर नगरीची प्रसिद्ध ‘कावड यात्रा’ यंदा सोमवारपासून (दि. १७) सुरू होत आहे. या यात्रेनिमित्त अकोट आणि अकोला शहरासह बाळापूर, पातूर, मुर्तिजापूर, बार्शीटाकळी व तेल्हारा या तालुक्यांतून हजारो शिवभक्त मोर्णा नद
.
यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, महापौर शारदा खेडकर, मनपा स्थायी सभापती विजय अग्रवाल, संतोष शिवरकर, जयंत मसने यांनी गांधीग्राम येथील महाकालेश्वर मंदिर परिसरात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणी केली. आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे यांनी अकोट, बाळापूर, पातूर, मुर्तिजापूर, बार्शीटाकळी व तेल्हारा येथील कावड मार्गावरील रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, पोलिस बंदोबस्ताची चोख व्यवस्था करण्याची मागणी केली. महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने यांनी माहिती दिली की, १७ ऑगस्टपर्यंत गांधीग्राम महाकालेश्वर मंदिरापर्यंतचा रस्ता पूर्ण केला जाईल. याशिवाय नॅशनल हायवे, जिल्हा परिषद, महसूल, आरोग्य, पोलिस विभागालाही समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्वधर्मीय सणांसाठी सहकार्याचे निर्देश जात-पात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन प्रशासनाने जिल्ह्यातील प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाला पूर्ण सहकार्य केले पाहिजे. आगामी गणपती, गोगानवमी आणि ईद यासह सर्व सण शांततेत व सन्मानाने पार पडावेत, यासाठी आतापासूनच योग्य नियोजन करावे, असे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले.