पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतून 20 कंपन्यांचे स्थलांतर आणि राज्यात गेल्या 5 वर्षांत 36 हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याच म
.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले की, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शब्दांचा आणि डेटाचा खेळ करण्यात आपला हात कोणीही धरू शकत नाही. पण आपली पोस्ट वाचल्यानंतर, सोयीचा अर्थ लावण्यातही कोणी आपला हात धरू शकत नाही, हे मान्य करावे लागेल, असा टोला पवारांनी लगावला आहे.
कंपन्या बंद पडणे हे धोरणांचे अपयश नाही का?
पुढे रोहित पवार म्हणाले, केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यात गेल्या पाच वर्षांत 36,000 हून अधिक कंपन्या बंद पडल्या. आपल्या म्हणण्यानुसार, त्यापैकी 76% कंपन्या म्हणजे सुमारे 27,000 कंपन्या डिसफंक्शनल झाल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कंपन्या डिसफंक्शनल का झाल्या? याचं उत्तर शोधणं मुख्यमंत्री म्हणून आपली जबाबदारी नाही का? कंपन्यांची नोंदणी झाली, पण त्या सुरूच झाल्या नाहीत, तर हे आपल्या धोरणांचं अपयश नाही का? 76% कंपन्या डिसफंक्शनल झाल्या, पण उर्वरित 9,000 कंपन्यांचं काय? त्या का बंद पडल्या, याचाही विचार करायला हवा.
‘डिसफंक्शनल’ नव्हे, 76 टक्के कंपन्या ‘स्ट्रक ऑफ’
सोयीचा अर्थ घेताना आपली थोडी गल्लत झालेली दिसते. केंद्र सरकारची वेबसाइट पाहिली असता, बंद पडलेल्या कंपन्यांपैकी 76% कंपन्या डिसफंक्शनल नसून ‘स्ट्रक ऑफ’ (Struck Off) झालेल्या आहेत. ‘स्ट्रक ऑफ’ म्हणजे कंपनीचं नाव केंद्र सरकारच्या रजिस्ट्रीमधून काढून टाकणे. एखाद्या कंपनीने आपला व्यवसाय थांबवला असेल किंवा नोंदणी करूनही व्यवसाय सुरू करू शकली नसेल, तर ती कंपनी स्ट्रक ऑफ होऊ शकते. त्यामुळे “कंपन्या सुरू होण्यापूर्वीच बंद पडल्या” हे आपले वक्तव्य वस्तुस्थितीला धरून नसल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कंपनी नोंदणी वाढीचा वेग कमी
रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्रात सर्वाधिक कंपन्या आहेत तसेच सर्वाधिक नवीन कंपनी नोंदणी होत असल्याचे आपण म्हटले आहे. ते नक्कीच खरे आहे, कारण महाराष्ट्राचा औद्योगिक पाया मुळातच मजबूत आहे. परंतु, नवीन कंपन्यांच्या नोंदणीची आकडेवारी बारकाईने पाहिली तर एक वेगळं चित्र दिसतं. आज महाराष्ट्र एकूण नोंदणीच्या बाबतीत वरच्या क्रमांकावर दिसत असला, तरी इतर राज्यांच्या तुलनेत कंपनी नोंदणीच्या वाढीचं प्रमाण महाराष्ट्रात कमी आहे. उत्तर प्रदेशमध्ये 453%, गुजरातमध्ये 417%, तेलंगणामध्ये 360%, तामिळनाडूमध्ये 322%, तर महाराष्ट्रात केवळ 282% वाढ झाल्याचं दिसतं.
पायाभूत सुविधांत महाराष्ट्र नवव्या स्थानी
नीती आयोगाच्या Investment Friendliness Index 2026 मध्ये उद्योगांसाठीच्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत महाराष्ट्र नवव्या क्रमांकावर असल्याचा मुद्दाही आपण गांभीर्याने विचारात घ्यायला हवा, असा सल्ला रोहित पवारांनी दिला आहे. तसेच राहिला प्रश्न चाकणचा, तर उद्योजकांनी दोन दिवसांपूर्वी विस्तृत पत्रकार परिषद घेतली. ती पत्रकार परिषद आपण जरूर पहावी. आपण 12 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतल्याचा उल्लेख केला आहे. पण उद्योजकांनी पत्रकार परिषद घेऊन आपलं गाऱ्हाणं मांडलं, चौफेर टीका होऊ लागली, तेंव्हा आपल्या प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर बैठक घेण्यात आली. गेल्या वर्षी आंदोलन झालं, तेव्हाही बैठक घेण्यात आली होती, पण त्यानंतर पुढं काय झालं? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
उद्योगमंत्र्यांना ‘राजकीय उद्योगां’तून वेळ नाही
उद्योगमंत्र्यांबाबत बोलायचं झालं, तर कुठे उमेदवार पळाला, कुठे उमेदवाराची माघार झाली, कुठे काय, अशा अनेक राजकीय उद्योगांमध्ये ते सदैव व्यस्त असल्याने, त्यांच्याकडे कदाचित उद्योग विभागासाठी वेळ नसावा. त्यामुळे उद्योग विभागाला वेळ देऊ शकणारी सक्षम व्यक्ती मंत्री म्हणून असणं गरजेचं आहे. तहान लागल्यावर विहीर खोदणारे नकोत, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.
केवळ आकड्यांचा खेळ नको, प्रत्यक्ष समस्यांवर उपाययोजना करा
असो, हा राजकीय विषय नाही! त्यामुळे उद्योगांच्या अडचणींच्या संदर्भात आपण गांभीर्य दाखवाल आणि केवळ आकड्यांचा खेळ न करता प्रत्यक्ष समस्यांवर उपाय कराल, ही अपेक्षा! या विषयावर मी लवकरच सविस्तर प्रेसेटेशन घेणारच आहे. आपली भूमिका मांडण्यासाठी आपण प्रतिनिधी पाठवावा, अशी विनंती रोहित पवारांनी केली आहे.

या संदर्भातील या देखील बातम्या वाचा
5 वर्षांत 36 हजार कंपन्या बंद:आता चाकणमधून 20 कंपन्यांचे स्थलांतर; उद्योगांच्या दुरवस्थेवरून शरद पवारांचा सरकारवर घणाघात

पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल २० कंपन्यांनी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब समोर आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर चिंता व्यक्त करत जोरदार निशाणा साधला आहे. “पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचे स्थलांतर होणे किंवा ते बंद पडणे हे महाराष्ट्रासाठी निश्चितच भूषणावह नाही,” अशा शब्दांत पवारांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी
5 वर्षांत 36 हजार कंपन्या बंदचा मुद्दा तापला:पवारांच्या टीकेला CM फडणवीसांचे आकडेवारीसह प्रत्युत्तर- 76 टक्के कंपन्या कधी सुरूच झाल्या नव्हत्या!

पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतून 20 कंपन्यांचे स्थलांतर आणि राज्यात गेल्या 5 वर्षांत 36 हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना ‘X’ (ट्विटर) वरूनच अत्यंत सविस्तर आणि आकडेवारीसह सडेतोड उत्तर दिले आहे. वाचा सविस्तर