![]()
स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाबद्दलच्या भावना, विचार, अभिमान व्यक्त करण्यासाठी ‘दिव्य मराठी’च्या वतीने ‘लिखो अपने दिल की बात’ हा विशेष उपक्रम शनिवार, १५ ऑगस्ट रोजी क्रांती चौकातील स्वातंत्र्य स्मारक येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात नागरिकांना देशाबद्दलच्या आपल्या भावना संदेशाच्या माध्यमातून व्यक्त करता येणार आहेत. या वेळी शहराचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. क्रांती चौकातील स्वातंत्र्य स्मारक येथे आयोजित या उपक्रमात विशेष ‘सेल्फी पॉइंट’ उभारला आहे. नागरिकांना येथे सेल्फी काढून स्वातंत्र्य दिनानिमित्त आपला संदेश लिहिता येईल. ‘लिखो अपने दिल की बात’च्या माध्यमातून देशाबद्दलची भावना केवळ मनात न ठेवता शब्दांत व्यक्त करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे तरुणाईने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्वातंत्र्य दिनाचा उत्सव अधिक अर्थपूर्ण करण्याचेही आवाहनही केले आहे. या उपक्रमासाठी नभराज ग्रुपचे राजेश बटोले, परिपूर्ती ग्रुपचे जयप्रकाश धूत, एक्सेल पॉवर सोलारचे राहुल राजपूत यांचे सहकार्य लाभले आहे. ‘प्रो मार्केटिंग’चे रमण कंकाळ हे सोशल मीडिया पार्टनर आहेत. सेल्फी पॉइंटचे विशेष आकर्षण क्रांती चौकात विशेष सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहे. नागरिकांना तेथे छायाचित्र काढून स्वातंत्र्य दिनानिमित्त आपला संदेश नोंदवता येईल. देशभक्तिपर भावना व्यक्त करण्यासोबतच हा सेल्फी पॉइंट तरुण, कुटुंबीयांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल. धुरंधर मोटोक्लबचा अनोखा उपक्रम ‘लिखो अपने दिल की बात’ उपक्रमासोबतच धुरंधर मोटोक्लबच्या वतीने ‘तिरंगा राइड’होणार आहे. ‘देशप्रेमाची एक सवारी!’ हा संदेश घेऊन दुचाकीस्वार हातात तिरंगा घेऊन शहरातून फेरी काढणार आहेत. ‘दिव्य मराठी’ कार्यालयापासून सकाळी ७ वाजता ही रॅली सुरू होणार आहे.
Source link
स्वातंत्र्यदिनी ‘दिव्य मराठी’तर्फे क्रांती चौकात देशभक्तीचा जागर:6 तास चालणार उपक्रम, ‘लिखो अपने दिल की बात’ अभियान; विविध कार्यक्रमांचे आयोजन