Headlines

Blinkit Zepto Instamart FDA Raid; Tukaram Mundhe Suspends 12 Licenses


अवघ्या 10 मिनिटांत घरपोच किराणा सामान आणि खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या ‘क्विक कॉमर्स’ प्लॅटफॉर्म्सचा वापर सध्या मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, या सुविधा देणाऱ्या कंपन्यांच्या ‘डार्क स्टोअर्स’मधून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेब

.

कुणाचे किती परवाने निलंबित?

राज्यभरात तब्बल 83 ठिकाणी एफडीएने विशेष तपासणी मोहीम राबवली. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक आस्थापनांना 60 सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या असून, एकूण 12 आस्थापनांचे FSSAI परवाने थेट निलंबित करण्यात आले आहेत.

निलंबित परवान्यांची कंपनीनिहाय आकडेवारी

Blinkit (ब्लिंकिट): 5 डार्क स्टोअर्सचे परवाने निलंबित

Zepto (झेप्टो): 5 डार्क स्टोअर्सचे परवाने निलंबित

Instamart (इन्स्टामार्ट): 2 डार्क स्टोअर्सचे परवाने निलंबित

एकट्या मुंबई शहर व उपनगरात २४ ठिकाणी तपासणी करण्यात आली असून, त्यातील १० आस्थापनांचे परवाने निलंबित तर १४ ठिकाणी सुधारणा नोटिसा देण्यात आल्या आहेत.

एफडीएच्या धाडीत काय-काय आढळले?

तपासणीदरम्यान या नामांकित कंपन्यांच्या गोदामांमध्ये स्वच्छतेचा पार बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. अनेक गोदामांमध्ये झुरळे (कॉकरोच), उंदीर, उंदरांची विष्ठा आणि सरडे यांचा प्रादुर्भाव आढळून आला. खराब व कुजलेल्या भाज्या आणि मुदत संपलेले (Expired) खाद्यपदार्थ ग्राहकांना पाठवण्यासाठी ठेवल्याचे उघड झाले. फ्रोजन आणि डेअरी उत्पादनांसाठी आवश्यक असणारे ० ते ४ अंश सेल्सिअस तापमान न राखणे. सांडपाण्याची अस्वच्छता, गंजलेले रॅक्स आणि अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवल्याचे प्रकार समोर आले.

शहरनिहाय कारवाई आणि प्रमुख त्रुटी

  • मालाड (Blinkit): चिलरचे तापमान आवश्यक मर्यादेपेक्षा जास्त होते. गंजलेले रॅक्स, शाकाहारी-मांसाहारी पदार्थांचे एकत्रिकरण आणि ४० फूड हँडलर्सची वैद्यकीय तपासणीच झाली नसल्याने परवाना निलंबित.
  • घाटकोपर (Blinkit): ड्रेनेज व्यवस्था खराब, कचरा व्यवस्थापन शून्य आणि कुजलेल्या भाज्या आढळल्या. (४६% गुण).
  • अंधेरी व वांद्रे (राजीडी रिटेल): अंधेरीमध्ये मुदत संपलेले ‘झोराबीयन चिकन’ अयोग्य तापमानात आढळले (ते तातडीने नष्ट करण्यात आले). तर वांद्रे येथे चक्क उंदरांची विष्ठा आणि सरडे आढळले.
  • लोखंडवाला व मुलुंड (Zepto): खाद्यपदार्थ आणि केमिकल वस्तू एकत्र ठेवल्याचे आढळले. कूलिंग सिस्टीम अपुरी असल्याने (अनुक्रमे ४७% आणि ४५% गुण) कारवाई.
  • अंधेरी (Instamart): अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवलेले आढळले. अपुऱ्या जागेमुळे ५५% गुण देऊन ‘नॉन-कम्प्लायन्स’ नोंदवण्यात आले.
  • वारजे (Swinsta/Instamart): झुरळांचा मोठा प्रादुर्भाव आणि प्रचंड अस्वच्छतेमुळे परवाना निलंबित करण्यात आला.
  • लोहेगाव (Zepto): मुदत संपलेल्या अन्नाची साठवणूक आणि कोल्ड चेन खराब असल्यामुळे परवाना निलंबित.
  • कराड (Blinkit): येथे काम करणाऱ्या तब्बल १२५ डिलिव्हरी रायडर्सकडे वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि ओळखपत्रेच नसल्याचे उघड झाले. येथील दुचाकी डिलिव्हरी ऑपरेशन्स त्वरित बंद पाडण्यात आले.

एफडीएचा कडक इशारा: खरेदी-विक्री पूर्णपणे बंद!

ज्या डार्क स्टोअर्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, त्यांना आता अन्नपदार्थांची खरेदी, विक्री किंवा डिलिव्हरी (वितरण) पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांना स्वच्छता, योग्य साठवणूक, कीटक नियंत्रण (Pest Control) आणि ‘FIFO/FEFO’ (First In, First Out / First Expire, First Out) या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे अत्यंत कडक निर्देश दिले आहेत.

हेही वाचा…

स्वातंत्र्य दिन विशेष: राज्य शासनाच्या धोरणाचे विदारक वास्तव:देशभरात शहिदांच्या वारसांना नोकरी; राज्यात मात्र 5 एकर जमीन मिळेना

देशातील तेलंगण, पंजाब, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालने शहिदांच्या वारसांना ‘विशेष बाब’ म्हणून थेट वर्ग-१ व वर्ग-२ च्या शासकीय पदांवर सामावून घेतले आहे. मात्र, महाराष्ट्रात आजही शहिदांचे वारस केवळ तृतीय किंवा चतुर्थ श्रेणीच्या नोकरीसाठी आणि शासनाने जाहीर केलेल्या ५ एकर जमिनीसाठी लालफितीत अडकले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.