Headlines

Maharashtra Suitability Certificate Mandatory for Cultural Programs & Lavani


महाराष्ट्राची समृद्ध लोककला, विशेषतः लावणी आणि तमाशाच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील सादरीकरणाला आणि ‘डीजे लावणी’च्या धिंगाण्याला आता कायमचा लगाम बसणार आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केला

.

नेमका निर्णय काय?

सध्या राज्यभरात अनेक ठिकाणी पारंपरिक लावणीच्या नावाखाली ‘डीजे’च्या तालावर अत्यंत बीभत्स आणि अश्लील नृत्य प्रकार सादर केले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. यावर कठोर कारवाई करत शासनाने नियम लागू केले आहेत. यानुसार, सार्वजनिक ठिकाणी होणारी नाटके, एकांकिका, तमाशा, लोकनाट्य, लोकसंगीत, वगनाट्य, मेळे आणि विशेषतः लावणीच्या कार्यक्रमांसाठी आता आधी संहिता (Script), निवेदन किंवा सादरीकरणाचा सारांश रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाला सादर करावा लागेल. त्यात कोणत्याही प्रकारची अश्लीलता नसल्याची खात्री झाल्यानंतरच मंडळाकडून ‘Suitability Certificate’ दिले जाईल.

पोलिसांची कडक पडताळणी

आयोजकांना हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच ते स्थानिक पोलिसांना सादर करावे लागेल. पोलीस प्रशासनाने या प्रमाणपत्राची सखोल पडताळणी केल्यानंतरच कार्यक्रमाला अधिकृत परवानगी दिली जाईल. विनाप्रमाणपत्र कार्यक्रम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल. लावणीच्या कार्यक्रमात डीजे (DJ) किंवा पाश्चिमात्य संगीताचा वापर न करता, पारंपरिक वाद्येच (उदा. ढोलकी, हलगी, तुणतुणे) वापरणे बंधनकारक असल्याचेही सांस्कृतिक विभागाने स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठपुरावा

महाराष्ट्राच्या लोककलेच्या नावाखाली सुरू असलेला हा अश्लीलतेचा बाजार थांबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने’ सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी या संदर्भात सरकारसोबत वारंवार पत्रव्यवहार करून कारवाईची आग्रही मागणी केली होती. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत सांस्कृतिक कार्य विभाग आणि रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने हे महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत.

लोककलेचे पावित्र्य आणि कलाकारांचे संरक्षण

महाराष्ट्राची लावणी आणि तमाशा हा राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू आहे. मात्र, काही अपप्रवृत्तींकडून ‘डीजे लावणी’च्या नावाखाली अश्लीलतेचा आणि आक्षेपार्ह सादरीकरणाचा वापर करून या नियमांचा गैरवापर केला जात होता. यामुळे खऱ्या अर्थाने लोककला जपणारे आणि सादर करणारे पारंपरिक कलावंत व्यथित झाले होते. या नव्या निर्णयामुळे अश्लील सादरीकरणाला आणि डीजेच्या कर्णकर्कश गोंगाटाला कायदेशीर आळा बसेल. तसेच, महाराष्ट्राची पारंपरिक लोककला, तिचे मूळ सौंदर्य आणि अस्सल कलाकारांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण होईल, असा विश्वास राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग आणि कला क्षेत्रातील मान्यवरांकडून व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा…

तुकाराम मुंढेंचा धडाका:10 मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA ची धाड; 12 परवाने निलंबित

अवघ्या 10 मिनिटांत घरपोच किराणा सामान आणि खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या ‘क्विक कॉमर्स’ प्लॅटफॉर्म्सचा वापर सध्या मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, या सुविधा देणाऱ्या कंपन्यांच्या ‘डार्क स्टोअर्स’मधून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आता एक अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात Blinkit, Zepto आणि Instamart या प्रमुख कंपन्यांच्या डार्क स्टोअर्सवर अचानक धाडसत्र राबवण्यात आले. या कारवाईत थेट 12 डार्क स्टोअर्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. येथे वाचा सविस्तर बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.