Headlines

परसोडा येथे संत बहिणाबाई अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ:51 फूट उंच ध्वजाचे महंत रामगिरी महाराज, स्वामी शांतिगिरी महाराज, मधुसूदन महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण‎




वैजापूर तालुक्यातील परसोडा येथे १७ ते २५ ऑगस्ट दरम्यान आयोजित संत बहिणाबाई महाराज संस्थानच्या ४७ व्या अखंड हरिनाम फिरता नारळी सप्ताहाचा ध्वजारोहण सोहळा गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी संत, महंत आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. ४० एकरांच्या विस्तीर्ण परिसरात हा भव्य सोहळा होत असून, सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी सकाळी सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज, महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज, आणि मधुसूदन महाराज यांच्या उपस्थितीत संतांची भव्य मिरवणूक परसोडा गावातून काढण्यात आली. तब्बल तीन तास चाललेल्या या मिरवणुकीनंतर सप्ताह स्थळी ५१ फूट उंच संत बहिणाबाई महाराज अखंड हरिनाम फिरता नारळी सप्ताह ध्वजाचे रोहन करण्यात आले. गोदाधामचे महंत रामगिरी महाराज, वेरूळ आश्रमाचे स्वामी शांतिगिरी महाराज, आणि मधुसूदन महाराज यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडला. ‘जय हरी विठ्ठल’ आणि ‘संत बहिणाबाई महाराज की जय’च्या जयघोषाने आणि मेघराजाच्या उपस्थितीने परिसर दुमदुमून गेला. यावेळी मार्गदर्शन करताना महंत रामगिरी महाराज यांनी, संतांचे विचार व हरिनामाचा गजर समाजाला योग्य दिशा देतो, असे सांगितले. जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांनी परधन, परस्त्रीचा त्याग करून तरुणांनी व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास आमदार रमेश बोरनारे, नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, मान्सूक झांबड, कल्याण दांगोडे, सुभाष तांबे, वंदना शिंदे, ज्ञानेश्वर जगताप, भागीनाथ मगर, प, स . सदस्य राहुल शेळके डॉ. जीवन राजपूत यांच्यासह परसोडा, बोर दहेगाव, भिवगाव, धोंदलगाव यांसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. भाविकांसाठी विविध सुविधांचे आयोजन या अखंड हरिनाम सप्ताहासाठी ४० एकरात उभारलेला भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सप्ताहाच्या सुरुवातीपासून सलग सात दिवस दोन्ही वेळा आमटी-भाकरीचा महाप्रसादाचा भाविकांना लाभ घेता येणार आहे. भाविकांसाठी आकर्षक विद्युत रोषणाई, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि स्वच्छतेचे चोख नियोजन समितीने केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *