Headlines

मनमाडच्या दरगुडे स्कूलमध्ये पदग्रहण सोहळा:विद्यार्थिनी स्वरा पगार हेड गर्ल, तर अनुज दराडे हेड बॉयपदी नियुक्त; चार हाऊसेस‌ची स्थापना‎




बी. जी. दरगुडे पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा पदग्रहण सोहळा झाला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त, जबाबदारीची जाणीव, संघभावना आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. लोकशाही पद्धतीने निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधींना विविध पदांची जबाबदारी सोपविण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शाळेची शिस्त, संस्कार व प्रतिष्ठा जपण्याचा संकल्प केला. नववीतील स्वरा पगार हिची हेड गर्ल, तर आठवीतील अनुज दराडे याची हेड बॉय म्हणून निवड झाली. त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीयत्व, नेतृत्वगुण, संघभावना, शिस्त आणि सकारात्मक स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्यासाठी चार हाऊसेसची स्थापना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज हाऊसच्या प्रमुख सगुणा लाटे व कॅप्टन प्रतीक काळे, लोकमान्य टिळक हाऊसच्या प्रमुख कविता शिंदे व कॅप्टन सार्थक वाघ, भगतसिंग हाऊसच्या प्रमुख शोभा पगार व कॅप्टन आकाश काकड, तर सुभाषचंद्र बोस हाऊसच्या प्रमुख शितल गांगुर्डे व कॅप्टन मयूर खताळ यांची नियुक्ती करण्यात आली.या हाऊसेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकता, शिस्त, सहकार्य, नेतृत्व, जबाबदारी आणि देशप्रेमाची मूल्ये रुजविण्यात येणार आहेत. आयोजन समन्वयक विमल मारणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अध्यक्ष व पदाधिकारी निलेश दरगुडे, प्रदीप दरगुडे, भागवत दरगुडे, मुख्याध्यापिका सुलताना शेख, मनीषा वाघ यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *