![]()
जिल्ह्यातील बँकांमध्ये रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नगदी, रोखीचे व्यवहार रखडले आहेत. शहराच्या तुलनेत ग्रामीण, आदिवासी भागातील अर्थव्यवस्थेवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. कारण, शहरात बहुतांश लोक हे युपीआय, फोन पे, गुगल पे, ऑनलाईन पैशाचे व्यवहार करतात. परंतु, ग्रामीण भागात अजुनही रोख रकमेशिवाय भागत नाही. शेतमजूर, कामगारांना रोख रक्कमच द्यावी लागते. ती थकली आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ५० लाखाची मागणी केल्यास फारतर २० ते २५ लाख रुपये रोख पाठवली जात असून त्यातच भागवावे लागत असल्याचे बँक व्यवस्थापकांचे म्हणणे आहे. ही परिस्थिती निवळण्यास किमान एक आठवडा लागेल, असे बँक व्यवस्थापकांनी सांगितले. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना मजुरी देण्यासह शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यात अडथळे येत असून आर्थिक नियोजन कोलमडले आहे. तसेच व्यापाऱ्यांनाही रोख रकमेअभावी व्यवहार करणे कठीण जात आहे. जिल्ह्यात अमरावतीनंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे उर्वरित. पान ४ ^रोख रक्कम उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर चुकारा करणे कठीण होत आहे. त्यामुळे आमचे व्यवहार अडचणीत आले आहेत.बँकांनी बाजाराच्या दिवशी पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध करून द्यावी, मेळघाटातील बहुतांश गावामध्ये ऑनलाईन सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांना नगदीच चुकारा लागतो. मात्र, बँकेत नगदी मिळत नसल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. – सतीश व्यास, संचालक, कृउबास अचलपूर सुटीचे दिवस, सण-उत्सव, पर्यटन तसेच लग्न सराई असल्याने सर्वांनाच रोख रकमेची आवश्यकता आहे. अशात एटीएममधील रोख लवकर संपत आहे. कारण, बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे मागितलेल्या रोख रकमेच्या तुलनेत त्यांच्याकडे निम्मी रोख रक्कम येत असल्याने त्यांनाही एटीएममध्ये सध्या विचारपूर्वक रोख रक्कम टाकावी लागत आहे. मागणी जास्त व पुरवठा कमी अशी स्थिती असल्याने एटीएम रिकामे होत आहेत. नरेश हेडाऊ, शिखर बँक व्यवस्थापक एटीएममधील रोखही लवकर संपत आहे आमचे सध्याचे व्यवहार अडचणीत आलेत रोज २० लाखाची मागणी, पण रोखच नाही आम्ही दररोज २० लाखाची मागणी करतो. परंतु, जिल्ह्यात सर्वच बँकांमध्ये रोख रकमेचा तुटवडा आहे. कारण बँकेत रोखच येत नाही. क्षेत्रिय कार्यालयालाकडून पुढच्या आठवड्यात रोख येईल असे सांगण्यात आले आहे. तोवर आम्हालाकाही करता येणार नाही. – मंगेश भुरे, शाखा व्यवस्थापक, सेंट्रल बँक, घाटलाडकी
Source link
बँकांत रोकड टंचाई:अमरावतीची ग्रामीण अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर, ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे व्यवहार खोळंबले