Headlines

'स्वातंत्र्यदिनी तरी खोटं बोलू नका':पंतप्रधान मोदींच्या भाषणावर संजय राऊतांचा घणाघात, मुख्यमंत्री फडणवीसांनाही दिला इशारा




स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातील विविध मुद्द्यांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मोदींनी युवाशक्तीबाबत व्यक्त केलेल्या भूमिकेचे स्वागत करतानाच, देशाच्या सत्तेत तरुणांना अधिक संधी देण्याची वेळ आली असल्याचे राऊत म्हणाले. तसेच कोरोना काळातील विरोधकांच्या भूमिकेबाबत मोदींनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. शिवसेना पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. युवाशक्तीनेच देशाला दिशा दिली मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात युवाशक्तीचा उल्लेख केला. यावर बोलताना राऊत म्हणाले की, देशाची जडणघडण आणि देशाला मोकळा श्वास घेण्याची संधी देण्यात युवाशक्तीचे मोठे योगदान आहे. भगतसिंगांसारखे तरुण देशासाठी फासावर गेले. आजही देशातील विविध प्रश्नांविरोधात तरुण आंदोलने करत असून, देशाभोवती निर्माण झालेला ‘गळफास’ दूर करण्यासाठी युवाशक्ती पुढे येत आहे, असा दावा त्यांनी केला. मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून युवाशक्तीचे आभार मानले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असेही राऊत म्हणाले. मात्र, ज्यांचे वय ७५ वर्षे झाले आहे, त्यांनी आता युवाशक्तीच्या हातात सत्ता सोपवली पाहिजे. हीच देशाच्या स्वातंत्र्याला खरी मानवंदना ठरेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. ‘स्वातंत्र्यदिनी तरी खोटे बोलू नये’ कोरोना काळात विरोधकांनी देशात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण केल्याचे मोदींनी लाल किल्ल्यावरून म्हटल्याबाबत राऊत यांनी तीव्र आक्षेप घेतला. मोदी लाल किल्ल्यावरून खोटे बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. आज देशाचा स्वातंत्र्यदिन आहे, या दिवशी तरी खोटे बोलू नये, असे राऊत म्हणाले. स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसची भूमिका डावलता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘न्यायालयाला त्यांचे काम करू द्या’ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणासंदर्भातील न्यायालयीन सुनावणीवरही राऊत यांनी भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे म्हटल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी निवडणुकीतील विजयावर प्रश्न उपस्थित केले. सरकारने योजनांच्या माध्यमातून मतदारांना आर्थिक लाभ देऊन निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयात निकाल आपल्या बाजूने लागेल, अशी वक्तव्ये केली जात असल्यावरही राऊत यांनी सवाल उपस्थित केला. न्यायालयाला धमक्या दिल्या जात आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. न्यायालयाने स्वतंत्रपणे आपले काम करू द्यावे, असे आवाहन करत फडणवीस यांनी धमकीची भाषा करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. या वक्तव्यांची नोंद सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणणार असल्याचे राऊत म्हणाले. ‘स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले असे भाजपला वाटते का?’ भाजपवर टीका करताना राऊत यांनी स्वातंत्र्यदिनाच्या मुद्द्यावरूनही निशाणा साधला. भाजपला देशाला स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले असे वाटत असेल, तर मोदी पंतप्रधान झाल्याच्या तारखेलाच त्यांनी स्वातंत्र्यदिन साजरा करावा, अशी टीका त्यांनी केली. स्वातंत्र्यदिन हा कोणाचीही खासगी मालमत्ता नाही, असेही राऊत म्हणाले. अमित शहांवरील टीकेचे राऊतांकडून समर्थन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेबाबतही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. पृथ्वीराज चव्हाण यांनी काहीही चुकीचे बोलले नसल्याचे ते म्हणाले. विरोधक संसदेत प्रश्न विचारत असताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्याला सामोरे गेले पाहिजे. प्रश्नांना सामोरे जाणे शक्य नसेल तर राजीनामा द्या, अशी टीका राऊत यांनी केली. हेही वाचा.. हेही वाचा.. मोदी म्हणाले- देशाला बौद्धिक नक्षलवादापासून वाचवा:तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न; महिला आरक्षणाचे राजकारण करू नये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून ७६ मिनिटांचे भाषण केले. पंतप्रधानांनी नमूद केले की, सशस्त्र नक्षलवादी आता कालबाह्य झाले असले, तरी ‘वैचारिक नक्षलवादी’ संधीच्या शोधात आहेत. ते समाजाला चुकीच्या मार्गावर नेण्यासाठी विविध कारवाया करत आहेत. अशा व्यक्ती हिंसाचार आणि अराजकतेचा मार्ग स्वीकारत आहेत. या वैचारिक नक्षलवाद्यांची ओळख पटवून त्यांना वेगळे पाडले पाहिजे. देशातील तरुणांना विकसित राष्ट्र घडवण्याच्या कार्यात सहभागी करून घेतले पाहिजे. सविस्तर वाचा स्वातंत्र्यदिनाचा उत्साह: मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्रालयात, एकनाथ शिंदेंनी ठाण्यात तर सुनेत्रा पवारांनी बीडमध्ये केले ध्वजारोहण देशभरात आज ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी राज्यातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत संबोधित केले. आपल्या भाषणातून त्यांनी महाराष्ट्रातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *