Headlines

उजनीचे पाणी कारंब्यात:सीना नदीद्वारे आवर्तन 25 दिवस चालणार रोटेशन




उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथील शेतकऱ्यांची पाण्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. उजनी प्रकल्पाचे पाणी सीना नदीतून शिरापूर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात आणण्यात आले असून, मोहितेवाडी येथून चार उपसा पंपांच्या साहाय्याने हे पाणी शुक्रवारी कारंबा शिवारात पोहोचले. या आनंदाच्या क्षणी शेतकरी दत्तात्रय भुट्टे यांच्या हस्ते पाण्याचे पूजन करण्यात आले. पुढील २५ दिवसांसाठी हे पाण्याचे रोटेशन सुरू राहणार असून यामुळे परिसरातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसऱ्या टप्प्यात १० गावांना मिळणार पाणी शिरापूर योजनेच्या टप्पा क्रमांक दोन अंतर्गत परिसरातील अनेक गावांना दिलासा मिळणार आहे. यामध्ये प्रमुख गावे नान्नज, बीबीदारफळ, अकोले, काटी, गुळवंची, मार्डी, नरोटेवाडी, कारंबा, भोगाव आणि बानेगाव आहेत. या जलपूजन प्रसंगी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनायक सुतार, महेश पेंडपाले, संजय आदाटे, खंडू भुट्टे, बाणाजी आदाटे, काकासाहेब चव्हाण, हरिहर सुतार, दीपक सुतार, बबलू निचळ यांच्यासह कारंबा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ६३३ हेक्टर शेती हिरवीगार होणार या आवर्तनामुळे एकट्या कारंबा गावातील सुमारे ६३३ हेक्टर जमिनीला भविष्यात शाश्वत पाणीपुरवठा होणार आहे. प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना आउटलेटला पाईपलाईन जोडून हे पाणी थेट आपापल्या शेतापर्यंत नेण्याचे आवाहन करण्यात आले आहे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *