Headlines

अहिल्यानगर:जिल्ह्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक




स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलिस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या उल्लेखनीय, गुणवत्तापूर्ण आणि दीर्घकालीन निष्कलंक सेवेचा गौरव करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या तीन पोलिस अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक, तर २७ पोलिस अधिकारी व अंमलदारांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपतींकडून शौर्यपूर्ण कामगिरी, उल्लेखनीय सेवा आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलिस अधिकारी व अंमलदारांना विविध पदके जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलातील उपनिरीक्षक संपत मुरलीधर खैरे (सुपा पोलिस ठाणे), उपनिरीक्षक शैलेश चंद्रकांत उपासनी (नागरी हक्क संरक्षण) आणि सहाय्यक उपनिरीक्षक अन्वरअली सय्यदअली सय्यद (मुख्यालय) यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर सहायक निरीक्षक हेमंत थोरात, सहायक उपनिरीक्षक मनोहर शेजवळ, संजय खंडागळे, अन्वरअली सय्यदअली सय्यद, विजय लोंढे, किरण शेलार, किरण शेलुकर, अंमलदार सचिन पवार, रेहान शेख, कृष्णा कुऱ्हे, दिगंबर कारखिले, रंगनाथ नरसाळे, मल्लिकार्जुन बनकर, कृष्णा विधाटे, राजु सुद्रिक, संदीप पवार, संतोष ओव्हळ, सचिन जाधव, दीपक घाटकर, अभिजित अरकल, सुयोग सुपेकर, सुरेश माळी, माधुरी तोडमल, किर्ती कांजवणे, भाग्यश्री भिटे, राहुल सोळुंके, अमोल घुले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *