Headlines

महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्यांची जनता 'वाट' लावेल:काँग्रेसचे धोरण महिलाविरोधी, अमरावती अत्याचार प्रकरणाचा सखोल तपास होणार- चंद्रशेखर बावनकुळे




ज्या खासदारांनी काल महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात मतदान केले त्या खासदारांना कधीच निवडणूक जिंकता येणार नाही, त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. बहिणींना प्रतिनिधित्व मिळू नये म्हणून हा विरोध करण्यात आला, काँग्रेसने कधीही महिलांना सन्मान दिला नाही, असे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तर महिलांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या सर्वांना महाराष्ट्रातील आणि देशाची जनता उद्ध्वस् करेल. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अमरावती अत्याचार प्रकरणी मी आज पोलिस अधीक्षकांसोबत चर्चा करणार आहे. माझे त्या प्रकरणाकडे लक्ष आहे. या प्ररकणी सखोल तपास करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. पोलिसांना तपास करण्यासाठी काही गोष्टींची गरज लागणार आहे का? या चर्चा करणार आहे. चौकशी भरकटेल असे विधान कोणीही करू नये, या प्रकरणर 7 मोबाईल पकडले गेले आहेत. महिलांना प्रतिनिधित्व मिळू नये म्हणून विरोधात मतदान चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काल काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी लोकसभेमध्ये नारी शक्ती विधेयकाला प्रचंड विरोध केला. त्या विधेयकाच्या विरोधात मतदान केले, काँग्रेसचे महिलाविरोधी धोरण आहे. काँग्रेसने कधीही महिलांना सन्मान दिला नाही हे दिसून आले. ज्या खासदारांनी विरोधात मतदान केले त्या खासदारांना त्यांच्या मतदारसंघासह देशभरातील महिला बहिणी त्यांची वाट लावतील. महिलांना 33 टक्के आरक्षण देत विकसित भारतामध्ये महिलांचे स्थान असावे यासाठी मोठा निर्णय घेतला. या निर्णयाला विरोध केला. यापूर्वी देखील त्यांनी तेच केले आहे. आमच्या 70 कोटी महिलांना प्रतिनिधित्व मिळू नये यासाठी मतदान केले आणि विधेयक मंजूर झाले नाही म्हणून आनंद उत्सव केला. हा महिलांचा अपमान आहे. यामुळे जनता त्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. जनता विरोधकांना धडा शिकवेल चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रात 72 खासदार झाले असते तर 33 टक्के महिला खासदार झाल्या असत्या. आणि जवळपास साडेतीनशे आमदार झाले असते तर 150 पर्यंत महिला आमदार झाल्या असत्या, त्यांना प्रतिनिधित्व मिळू शकणार नाही. यांना जनता आणि महिला धडा शिकवेल. जर लोकसभेच्या सीट वाढल्या असत्या तर आमच्या बहिणींच्या सीट वाढल्या असत्या. एससी, एसटीच्या जागा वाढल्या असत्या. देशातील अनेक मोठ्या मतदारसंघात जनतेला न्याय देण्यासाठी खासदार वाढले असते. कारण काही मतदारसंघात 40 लाख मतदार आहे, त्यांना मतदारांपर्यंत जाता येत नाही. छोटे मतदारसंघ झाले तर लोकांना भेटता आले असते. खासदारांशी सध्या संपर्क होऊ शकत नाही, हे दोन्हीही विषय महत्त्वाचे होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *