Headlines

राहुल गांधी बदनामी खटला: हस्तक्षेप अर्ज फेटाळला:डॉ. पंकज फडणीस यांना 20 हजार रुपयांचा दंड, पुणे न्यायालयाचा निर्णय




लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी खटल्यात डॉ. पंकज फडणीस यांचा हस्तक्षेप अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी हा अर्ज फेटाळत डॉ. फडणीस यांना २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. हा खटला सध्या पुणे येथील विशेष न्यायालयात सुरू आहे. राहुल गांधी यांनी लंडन येथील भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सावरकरांचे पणतू सात्त्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात फौजदारी बदनामीचा खटला दाखल केला आहे. राहुल गांधींचे वकील ॲड. मिलिंद पवार सध्या सात्त्यकी सावरकर यांचा उलटतपास घेत आहेत. याच उलटतपासणीदरम्यान, मुंबईतील दादर येथील रहिवासी डॉ. पंकज फडणीस (वय ६६) यांनी या खटल्यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. त्यांनी आपली बाजू मांडण्याची तसेच साक्षीदार म्हणून माहिती देण्याची परवानगी मिळावी, यासाठी ॲड. विनोद सातपुते यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता. डॉ. फडणीस यांच्या अर्जानुसार, त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवन आणि कार्यावर दीर्घकाळ संशोधन केले आहे. त्यांनी सावरकरांच्या जीवनावर पीएच.डी. केली असून, सावरकरांचे पुत्र विश्वास सावरकर यांच्या शेजारी सुमारे १३ वर्षे वास्तव्य केल्याचा दावाही अर्जात केला होता. सावरकरांच्या जीवनकार्याबाबत सखोल आणि प्रत्यक्ष माहिती असल्याने त्यांना न्यायालयात बाजू मांडण्याची संधी मिळावी, असे त्यांचे म्हणणे होते. डॉ. फडणीस यांनी आपल्या अर्जात सात्त्यकी सावरकर यांच्या वंशपरंपरेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सात्त्यकी सावरकर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे थेट वंशज नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, सात्त्यकी सावरकर हे महात्मा गांधी यांच्या हत्येतील आरोपी गोपाळ गोडसे यांचे नातू असून, त्यांची आई हिमानी सावरकर यांनी मुस्लीम आणि ख्रिश्चनांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचे वक्तव्य केले होते, असा संदर्भही त्यांनी अर्जात दिला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *