Headlines

पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर प्रकाश महाजनांचा सवाल:म्हणाले- सोनिया गांधींची परवानगी असताना मनमोहन सिंग यांच्यात नाही म्हणण्याची क्षमता होती का?




राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकताच एक खळबळजनक गौप्यस्फोट करत, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असा मोठा दावा केला आहे. चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता या प्रकरणावर प्रकाश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. प्रकाश महाजन म्हणाले, सोनिया गांधी यांची परवानगी असताना मनमोहन सिंग यांच्यात नाही म्हणण्याची क्षमता होती का? पंतप्रधान कार्यालय सांभाळणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना हे माहीत नसावे. गोपीनाथ मुंडेंची पक्षातील नाराजी लपून नव्हती आणि ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. तसेच भाजपमधील काही लोकांना ते कॉंग्रेसमध्ये जावेसे वाटत होते. मात्र कॉंग्रेसमधील काही लोकांना म्हणजे विलासराव देशमुख यांना गोपीनाथराव कॉंग्रेसमध्ये नको होते. दुसरीकडे शरद पवार यांना वंजारी समाज मुंडेंसोबत राहील असे वाटल्याने त्यांनी प्रयत्न करून हा प्रवेश हाणून पाडला, असा दावा महाजन यांनी केला आहे. पुढे बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, नागपूरचे दोन लोक यावर आक्षेप. गडकरी ठीक पण देवेंद्र फडणवीस हे गोपीनाथराव यांच्या विरोधात जाणे शक्य नाही. गोपीनाथराव कधीही निवडणुकीला घाबरत नव्हते. गोपीनाथरावांच्या राजकीय खुनाचे डाग पृथ्वीराज चव्हाण यांच्या कपड्यावर आहेत. भाजप पक्षाने मुंडेंचा न्याय गडकरींना लावला नाही, पक्षाने गडकरींना मोठे स्थान दिले पण मुंडेंचा एक काळ अपमान केला. मुंडेवर अन्याय म्हणून फुंडकर यांना विरोधी पक्षनेतेपदावरून काढणारे गडकरीच होते, असा आरोपही महाजन यांनी केला आहे. नेमके काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की, मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठका झाल्या होत्या. गोपीनाथ मुंडे यांनी मंत्री करण्याची अट घातली होती, मंत्रीपद द्या अन्यथा नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत, असेही गोपीनाथ मुंडेंनी त्यावेळी म्हटले होते. सोनिया गांधी यांनी गोपीनाथ मुंडेंच्या पक्षप्रवेशाला परवानगी दिली, मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विरोधी पक्षातला खासदार आपल्याकडे घेऊन मंत्री करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने त्यांचा प्रवेश झाला नाही, असे चव्हाण यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *