![]()
तालुक्यातील मानूर येथे दि. १८ ते २५ ऑगस्टपर्यंत २३ वा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ग्रामदैवत हनुमानराय, मार्कडेश्वर भगवंत व ब्रह्मलिन स्वामी गोविंद भारती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच स्वामी हर्षद भारती महाराज, शशिकांत मुडावदकर, नितीन मुडावदकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होणार आहे. श्री मार्कडेश्वर बहुद्देशीय भजनी सेवा मंडळ, मानूर यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याची सुरुवात मंगळवारी (दि. १८) सकाळी ८ वाजता मंदिरात ग्रंथवाचनाने होईल. मंगळवारी (दि. २५) काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे. असे होणार दैनंदिन कार्यक्रम पहाटे ५ ते ६ : काकडा आरती, सकाळी ८ ते ११ : ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ६ ते ७ : हरिपाठ, रात्री ९ ते ११ : कीर्तन महोत्सव
Source link
कळवण:मानूरला उद्यापासून हरिनाम सप्ताह