![]()
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे १४ ऑगस्ट रोजी भांबरवाडी जिल्हा परिषद शाळेवर सकाळी दहा वाजेच्या सुमारास अचानक धडकले. या वेळी शाळेच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची पीटी सुरू होती. शालेय शिक्षणमंत्री भुसे यांना अचानक शाळेच्या प्रांगणात पाहून शिक्षकांची एकच धावपळ उडाली. भुसे यांनी थेट विद्यार्थ्यांची संवाद साधला. काही प्रश्न विचारले. ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर देण्यासाठी हात वर केले त्यांना प्रश्न न विचारता सर्वात गरीब व फाटक्या कपड्यातील विद्यार्थी आदेश फुरसने व शुभम राठोड यांना बालभारतीचे मराठीचे पुस्तक वाचण्यास सांगितले. ते वाचताना अडखळले. दरम्यान, सोसायटीचे चेअरमन राहुल राठोड, शालेय समिती अध्यक्ष राजू राठोड, चंदर राठोड, सुनील राठोड, विलास राठोड आदींसह ग्रामस्थ जमा झाले. या वेळी शिक्षणमंत्री भुसे यांनी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व शिक्षकांशी संवाद साधला.
Source link
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या परीक्षेत विद्यार्थी नापास:भांबरवाडी जि. प. शाळेला मंत्री भुसे यांची अचानक भेट