Headlines

राज्यात पावसाचा जोर कुठे वाढणार, कुठे ओसरणार?:पुणे-सातारा घाटमाथ्यावर अतिमुसळधारेचा इशारा; मुंबईसह कोकणात मध्यम पाऊस, मराठवाड्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा




गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची संततधार सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या हवामानात संमिश्र स्थिती पाहायला मिळत असून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, काही जिल्ह्यांमध्ये पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. कोकण आणि मुंबई (रत्नागिरीला यलो अलर्ट) मुंबई आणि पालघर परिसरात आज पावसाचा जोर कमी राहील, येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, रायगड आणि रत्नागिरीत पावसाचा जोर अधिक राहील. हवामान खात्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पश्चिम महाराष्ट्र (घाटमाथ्यावर अतिमुसळधार) पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. मात्र, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील भागांसाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला असून, या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उपग्रह नकाशात पाहा मान्सूनच्या ढगांची स्थिती.. उत्तर महाराष्ट्र: नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यांत केवळ हलक्या पावसाची शक्यता आहे, तर नाशिकच्या घाट परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. धुळे, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा: मराठवाड्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. परभणी, बीड आणि हिंगोलीमध्ये केवळ हलक्या पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. विदर्भ (पावसाची उघडीप) संपूर्ण विदर्भात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. नागपूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ यांपैकी कोणत्याही जिल्ह्याला हवामान विभागाने कोणताही इशारा (अलर्ट) दिलेला नाही. ओडिशात पुराचे संकट; २.३७ लाख नागरिकांचे स्थलांतर एकीकडे महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी-अधिक होत असताना, दुसरीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या नवीन कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओडिशा राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य: हवामान खात्याने दिलेल्या अत्यंत मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आतापर्यंत प्रशासनाने २ लाख ३७ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. देशातील प्रमुख शहरांचे तापमान हेही वाचा.. UP-MP सह 10 राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट:ओडिशात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; 2.37 लाखांहून अधिकजण मदत शिबिरात बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे नवीन क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे आयएमडीने ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील १५ जिल्ह्यांना सोमवारी अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. याव्यतिरिक्त, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पूर्व मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, राजस्थान, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्ये आज हवामान स्वच्छ राहील. महाराष्ट्राच्या काही भागांत पाऊस पडू शकतो. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *