![]()
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे येथील तीन शाळकरी मुलींनी हातात छत्रीचा माइक पकडून थेट रस्त्यावरून केलेली दणकेबाज “रिपोर्टिंग’ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली अन् निद्रिस्त प्रशासनाला खड्डे बुजवण्यास भाग पाडले. या धाडसी “व्हायरल गर्ल्स’ची दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना मुंबईतील “शिवतीर्थ’ निवासस्थानी बोलावून कौतुकाची थाप दिली. तसेच त्यांना अभ्यास करण्याचा सल्लाही दिला. राज ठाकरेंचा प्रश्न अन् मुलींनी दिले ‘नाही’ उत्तर राज ठाकरेंनी कौतुकाने विचारले, “तुम्हाला भविष्यात रिपोर्टर व्हायचंय का?” त्यावर तिन्ही मुलींनी एकाच सुरात “नाही!” असे उत्तर दिल्याने राज ठाकरेही काहीसे अचंबित झाले. एका मुलीने स्टेनो, दुसरीने यूट्यूबर तर तिसरीने स्केच आर्टिस्ट बनण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले. कोणत्याही नेत्याने न बोलावता थेट राज ठाकरेंनी बोलावून केलेला हा सन्मान आयुष्यभरासाठी खास राहील, अशी भावना या विद्यार्थिनींनी व्यक्त केली. प्रशासन आले ताळ्यावर नेहा घारे, ज्योत्स्ना मुकणे व मानसी पवार या दहावीतील विद्यार्थिनींनी गावातील चिखलमय व खड्डेमय रस्त्याचा रोजचा त्रास मांडण्यासाठी व्हिडिओ तयार केला. या मुलींच्या व्हिडिओमुळे प्रशासनाला जाग आली अन् रस्त्याची तातडीने डागडुजी झाली.
Source link
खड्ड्यांविरोधात ‘छत्रीचा माइक’ अन् प्रशासनाची झोप उडवणारी रिपोर्टिंग:कर्जत तालुक्यातील कोंदिवडे येथील तीन शाळकरी मुलींचा व्हिडिओ व्हायरल