![]()
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा देशी-विदेशी मद्य विक्रेता संघाच्या महारक्तदान शिबिरात १ हजार २९८ रक्तदात्यांनी रक्तदान करून एक नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे. हॉटेल ग्रँड महफीलच्या रुबी हॉल येथे हे शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, व बळवंतराव वानखडे, आमदार प्रवीण पोटे, संजय खोडके, सुलभा खोडके, रवी राणा व राजेश वानखडे, महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे, महापालिकेच्या शिक्षण सभापती ॲड. प्रिती रेवणे, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम, मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी उपस्थित होते. या शिबिरादरम्यान अमरावती शहरात १ हजार १८७, तर धारणी तालुक्यात १११ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. रक्तदान शिबिरात ९ प्रमुख रक्तपेढ्यांनी सहभाग नोंदवला. यात अमरावती येथील इर्विन हॉस्पिटल, शासकीय रक्तपेढी, डॉ गोडे मेडिकल कॉलेज, संत गाडगेबाबा रक्तपेढी, डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, अकोला येथील लेडी हार्डिंग हॉस्पिटल, जिल्हा स्त्री रुग्णालय, डॉ. हेडगेवार रक्तपेढी, नागपूर येथील डॉ. हेडगेवार रक्तपेढी, जालना येथील जनकल्याण रक्तपेढी आणि यवतमाळ येथील एकनील रक्तपेढीचा समावेश आहे. शिबिराला महापालिकेचे विरोधी पक्षनेता विलास इंगोले, नगरसेवक प्रदीप हिवसे, चंदू खेडकर, प्रा. संजय तिरथकर, यश खोडके, सुनील राणा आदींनी भेट दिली. शिबीरात मेजर आनंद, मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी, अधीक्षक प्रमोद सोनोने, शशिकांत गर्जे, सीमा झामरे, नितीन देशमुख, अनिल भामोरे यांनी रक्तदान केले. यावेळी आनंद भामोरे, राजूभैय्या जैस्वाल, हरीश आलमचंदानी, इस्माइल लालूवाले, सायकलिंग असोसीएशनचे डॉ. चंद्रशेखर कुळकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. शिबीरासाठी सहकार्य करणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. प्रतिक्षा डांगे यांनी सूत्रसंचालन केले. राजगुरे यांनी आभार मानले. मद्य विक्रेता संघातर्फे अध्यक्ष नितीन देशमुख व इतर पदाधिकारी तसेच दारुबंदी विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी शिबीराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. १० हजाराचा टप्पा पार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त डॉ. पराग नवलकर यांनी आतापर्यंत यवतमाळ, अहिल्यानगर, बुलढाणा, वाशीम आणि अमरावती येथे १७ महारक्तदान शिबिरांचे आयोजन करून ९ हजार २६१ रक्त पिशव्यांचे संकलन केले आहे. त्यात स्थानिक शिबिराची भर पडल्याने आतापर्यंत एकूण १० हजार ५५९ रक्त पिशव्यांचे संकलन करत दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. या उपक्रमाची दखल स्टेट ब्लड ट्रान्सफ्यूजन महाराष्ट्र, मुंबई यांनी घेतली आहे.
Source link
महारक्तदान शिबिराच्या माध्यमातून 1,298 रक्त पिशव्यांचे केले संकलन:राज्य उत्पादन शुल्क विभाग; जिल्हा देशी-विदेशी मद्य विक्रेता संघाचा उपक्रम