Headlines

कॉंग्रेससाठी 'वंदे मातरम्' ही लढाऊ घोषणा:अपमान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही- पृथ्वीराज चव्हाण; अमित शहांसह संघावरही साधला निशाणा




कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी तसेच सोनिया गांधी यांच्यावर स्वातंत्र्यदिनी वंदे मातरम् गीताचा अपमान केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. यावर कॉंग्रेसच्या नेत्यांकडून देखील स्पष्टीकरण दिले जात आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील पत्रकारांशी बोलताना यावर भाष्य केले आहे. तसेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका देखील केली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘वंदे मातरम्’ गाण्याचा अपमान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कॉंग्रेससाठी इंग्रजांच्या काळात ‘वंदे मातरम्’ ही लढाऊ घोषणा होती. जेव्हा भाजपचे नेते इंग्रजांची माफी मागत होते, जेव्हा राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे लोक इंग्रजांना माफीनाम देत होते, जेव्हा या संघाच्या वरिष्ठ लोकांना इंग्रजांकडून पेन्शन मिळत होती, तेव्हा ‘वंदे मातरम्’ हे कॉंग्रेसची लढाऊ घोषणा होती. अमित शहा यांना स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्व माहीत नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे. अमित शहा नालायक गृहमंत्री दरम्यान, चार दिवसांपूर्वीच पृथ्वीराज चव्हाण यांनी अमित शहा यांच्यावर टीका करताना लायक नसलेला गृहमंत्री अशी टीका केली होती. ते म्हणाले होते, मोदी सरकारला 2029 च्या निवडणुकीची खात्री नाही, मला खात्री आहे. 2029 मध्ये सत्ता बदल होणार हे नक्की. मात्र, यासाठी विरोधकांनी एकत्र राहणे गरजेचे असून केंद्र सरकारची घटका भरली आहे. अमित शहा हे आपल्या कार्यालयात येऊन बसत होते, मात्र संसदेत येत नव्हते. संसदेत मी 19 वर्षे काम केले आहे. अमित शहा यांनी जाहीर केले असते की आम्ही सभागृहात बोलणार आहोत तर आम्ही थांबलो असतो. सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता का? अमित शहा नालायक गृहमंत्री आहेत, अशा शब्दांत चव्हाण यांनी शहा यांच्यावर टीका केली होती. पुढे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की, अमित शहा संसदेच्या अधिवेशन काळात सभागृहात आलेच नाही. सभागृहाला सामोरे जायला तुम्ही घाबरता हेच यातून सिद्ध होते. अमित शहा सभागृहात आले नाही हा घटनेचा, सभागृहाचा आणि जनतेचा अपमान आहे. तुम्ही नालायक गृहमंत्री आहात. पंतप्रधान मोदी यांचे जगभरात हासे होत आहे. कोणता पुरस्कार देणार असाल, तर मोदी येतील असे परराष्ट्र मंत्रालयाकडून इतर देशांना सांगितले जात आहे. एपस्टीन फाईलमध्ये अनिल अंबानी, पंतप्रधान मोदी, परराष्ट्र खात्यातील एक अशी तिघांची नावे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ही देखील बातमी वाचा नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड:मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (18 ऑगस्ट) महत्त्वाचा निर्णय दिला. 2013 मधील या हत्येप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सचिन अंदुरे याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, त्याला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *