Headlines

भोंदू मनोहर मामाच्या आयुष्याची आता कारागृहामध्ये ‘अमावास्या’:6 गुन्ह्यात 4 महिन्यांपासून तुरुंगात; पूजाअर्चेने दिवसाची सुुरुवात




करमाळा तालुक्यातील घोटी या गावात २७ एकरांवरील आश्रमात स्वत:चे साम्राज्य निर्माण करणारा भोंदू मनोहर भोसले ऊर्फ मनोहर मामा गेल्या दीड महिन्यापासून सोलापूरच्या कारागृहात ‘सरकारी पाहुणचार’ घेत आहे. स्वत:ला बाळू मामाचा अवतार असल्याचे भासवून आजवर शेकडो भाविकांना त्याने लाखो रुपयांचा गंडा घातला. काहींच्या जमिनी लाटल्या. महिला अत्याचाराचेही त्याच्यावर गुन्हे आहेत. दर अमावस्या, पोर्णिमेला घोटीच्या आश्रमात दरबार भरवून प्रतिमाणसी ११ ते २१ हजार रुपये उकळणाऱ्या भोंदूबाबाच्या आयुष्याची आता ‘अमावास्या’ झाली असून ६ गुन्ह्यात तो आता तुरुंगात खितपत पडला आहे. गुन्हे वाढत असल्याने त्याचा तुरुंगातील मुक्कामही वाढण्याची शक्यता आहे. तुरुंगवास तसा मनोहर मामाला नवीन नाही. यापूर्वीही २०२१ मध्ये महिला लैंगिक शोषणाच्या आरोपावरून त्याला अटक झाली होती. मात्र या आरोपातून बाहेर पडल्यानंतर त्याने भक्तांना गंडवण्याचा गोरखधंदा पुन्हा एकदा सुरु केला होता. घोटीतील त्याच्या आश्रमात दर अमावस्या, पोर्णिमेला मोठी गर्दी व्हायची. यात धनिकांची संख्या मोठी असायची. तिथे तो भाविकांना भविष्याची भीती घालून पैसे उकळायचा. परिसरातील लोकांच्या जमिनीही लाटल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अखेर पापाचा घडा भरल्यानंतर याच वर्षी एप्रिल महिन्यात पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. यानंतर एकापाठोपाठ एक गुन्ह्याची जंत्री वाढत गेली. एप्रिलमध्ये अटक झाल्यानंतर जूनअखेरपर्यंत तो करमाळ्याच्या कारागृहात होता. आता गेल्या दीड महिन्यापासून तो सोलापूरच्या तुरुंगाची हवा खातोय.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *