![]()
मुंबईची दिवाळी, पुण्याचा गणेशोत्सव, अहिल्यानगरचा मोहरम आणि जामखेडची नागपंचमी… महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैविध्यात जामखेडच्या पंचमीचे स्थान वेगळेच आहे. पंचमी म्हटले की जामखेडकरांच्या कानावर घुंगरांचा निनाद पडतो आणि शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण हो
.
राक्षसी पाळणे, मौत का कुआँ, गाढवाचा पन्नालाल शो, फिरती चक्री, लहान मुलांचे पाळणे, खेळण्यांची दुकाने आणि महिलांसाठी विविध वस्तूंची दुकाने यामुळे शहर गजबजून जाते. आठ ते दहा दिवस चालणाऱ्या या जत्रेत जामखेडसह परिसरातील गावांमधून नागरिक सहकुटुंब येतात. चारचाकी वाहनांमधून दूरवरूनही नागरिक उत्सवाचा आनंद घेण्यासाठी दाखल होतात. पंचमीच्या दुसऱ्या दिवशी होणारा ‘सकृबा’ हा या उत्सवाचा प्रमुख आकर्षणबिंदू आहे. रात्री शहरातील विविध गल्लीबोळांत नृत्याचे कार्यक्रम होतात. रंगीबेरंगी रोषणाईत सुरू होणाऱ्या या कार्यक्रमांना मोठी गर्दी होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नर्तिकांची पथके नृत्य करत पोलिस परेड ग्राऊंडवर दाखल होतात. येथे होणाऱ्या सामन्यात उत्कृष्ट पथकाची मानकरी म्हणून निवड केली जाते. जामखेड शहरात पंचमीनिमित्त मोठ्या प्रमाणावर जत्रा भरते.
जामखेडमध्ये तमाशा संपले, आता उरली कलाकेंद्रे… सुमारे पन्नास वर्षांपूर्वी तमाशा जामखेडच्या मनोरंजनाचे प्रमुख साधन होते. विठाबाई भाऊ मांग, कांताबाई सातारकर, रघुवीर खेडकर यांच्या लोकनाट्यांना रसिकांची मोठी पसंती होती. कालांतराने तमाशाला ओहोटी लागली आणि कलाकेंद्रांची संख्या वाढली. सध्या जामखेड परिसरात सुमारे दहा कलाकेंद्रे असून थिएटरमध्ये तिकीट काढून नृत्याचा आनंद घेण्याची नवी परंपरा रूढ झाली आहे.