Headlines

मालेगावात बस आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक:दोघांचा मृत्यू, 23 जण जखमी; 50 हून अधिक प्रवासी बसमध्ये असल्याची माहिती




नाशिक जिल्ह्यातील मालेगाव नजीक असलेल्या चाळीसगाव रोडवरील दहिवळ शिवार परिसरात बस आणि ट्रकचा अत्यंत भीषण अपघात झाला आहे. या घटनेत दोन प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तब्बल २३ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयंकर होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त बसमधून ५० पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. ही बस दहिवळ शिवार परिसरातून जात असताना समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकशी तिची जोरदार धडक झाली. वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघाताची तीव्रता मोठी होती. रुग्णालयात उपचार आणि ओळख पटवण्याचे काम सुरू या भीषण अपघातात २३ प्रवासी जखमी झाले असून त्यांना त्वरित जवळच्या शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दरम्यान, या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या दोन व्यक्तींची तसेच जखमी प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सध्या प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अपघातास नेमके कोण जबाबदार आहे, याचा शोध घेतला जात आहे. अमरावती-अकोला महामार्गावर थरार: भरधाव ट्रकने दुभाजक ओलांडून कारला चिरडले; प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू अमरावती-अकोला महामार्गावर लोणी परिसरात मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने रस्ता दुभाजक ओलांडून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात अमरावतीतील निवृत्त अधिकारी आणि उद्योजक किशोर काकाणी (58) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. नेमका अपघात कसा घडला? मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास किशोर काकाणी हे आपल्या मूळ गावाहून म्हणजेच कामरगावहून अमरावतीकडे परतत होते. प्रवासादरम्यान त्यांनी लोणी परिसरातील ‘हॉटेल संधू’जवळ आपली कार रस्त्याच्या कडेला उभी केली होती. नेमक्या याचवेळी अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या अनियंत्रित ट्रकने वेगातच रस्ता दुभाजक तोडला आणि थेट किशोर काकाणी यांच्या उभ्या असलेल्या कारवर जाऊन धडकला. हेही वाचा.. घाटकोपर स्थानकाचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ: लोकलच्या छतावर चढून ओव्हरहेड वायरला स्पर्श, 30 वर्षीय तरुण 45 टक्के भाजला; डोक्यालाही गंभीर दुखापत घाटकोपर रेल्वे स्थानकावर मंगळवारी सायंकाळी गर्दीच्या वेळी धक्कादायक घटना घडली. एका 30 वर्षीय तरुणाने लोकलच्या छतावर चढून ओव्हरहेड विद्युत तारेला स्पर्श केल्याने त्याला विजेचा तीव्र धक्का बसला. या दुर्घटनेत तो सुमारे 45 टक्के भाजला असून त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *