Headlines

Green Building Congress 2026 Mumbai



भारतात वेगाने होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासाला शाश्वत आणि पर्यावरणपूरक दिशा देण्यासाठी आगामी 26 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 24 व्या ‘ग्रीन बिल्डिंग काँग्रेस’ (GBC) चे आयोजन करण्यात आले आहे. ‘कॉन्फे

.

या वर्षीच्या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना “Forging a Sustainable Future – Do Good, Feel Good. Building Greener Worlds Together” अशी ठेवण्यात आली आहे.

25 वर्षांचा यशस्वी प्रवास आणि भारताची जागतिक भरारी

गेल्या 25 वर्षांत भारताने पर्यावरणपूरक इमारतींच्या (Green Buildings) क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. सद्यस्थितीत ‘आयजीबीसी’कडे (IGBC) 20,000 हून अधिक प्रकल्प नोंदणीकृत असून, 16.33 अब्ज चौरस फूट क्षेत्रासह भारत जगात 2 र्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा ‘ग्रीन बिल्डिंग’ फूटप्रिंट असलेला देश बनला आहे. आतापर्यंत 2 लाखांहून अधिक प्रतिनिधींनी या परिषदेत सहभाग घेतला आहे.

“शाश्वतता हा प्रत्येक विकासकामाचा पाया असावा”

या उपक्रमाविषयी बोलताना ‘सीआयआय-आयजीबीसी’चे राष्ट्रीय अध्यक्ष सी. शेखर रेड्डी म्हणाले: “भारत सध्या विकासाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. आपण नव्या शहरांची आणि पायाभूत सुविधांची उभारणी करत आहोत, ज्या पुढील अनेक दशके देशाचे भविष्य ठरवतील. त्यामुळे आपण किती जबाबदारीने बांधकाम करतो, हे महत्त्वाचे आहे. शाश्वतता हा केवळ तज्ज्ञांमधील चर्चेचा विषय न राहता, तो प्रत्येक विकासकामाच्या निर्णयाचा पाया असला पाहिजे.”

तर ‘सीआयआय-आयजीबीसी’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ए. आर. उन्नीकृष्णन यांनी सांगितले: “भारताच्या ग्रीन बिल्डिंग चळवळीचा पुढचा टप्पा हा केवळ वैयक्तिक प्रकल्पांपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण शहरे आणि पायाभूत सुविधांचे परिवर्तन घडवून आणणारा असावा. ‘ग्रीन बिल्डिंग काँग्रेस 2026’ हे भारतासाठी सुसंगत, व्यापक आणि प्रभावी ठरतील अशा जागतिक ज्ञानाला आणि उपायांना एकत्र आणण्याचे काम करेल.”

परिषदेची ठळक वैशिष्ट्ये

मोठी उपस्थिती: या 3 दिवसीय परिषदेत 3,000 हून अधिक प्रतिनिधी, 10,000 हून अधिक व्यावसायिक अभ्यागत (Business Visitors), 150 हून अधिक विचारवंत आणि 100 हून अधिक संस्थात्मक व औद्योगिक भागीदार सहभागी होणार आहेत.

  • ग्रीन बिल्डिंग एक्स्पो: परिषदेसोबतच पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन घडवणारे विशेष एक्स्पो आयोजित केले जाईल.
  • उद्योग क्षेत्राला चालना: गेल्या वर्षी या परिषदेत 1,000 हून अधिक ‘बी2बी’ (B2B) बैठका पार पडल्या होत्या, ज्यातून हरित तंत्रज्ञानाच्या देवाणभेवाणीला मोठी गती मिळाली.

या परिषदेच्या माध्यमातून सरकार, उद्योग क्षेत्र, वित्तीय संस्था, शिक्षण क्षेत्र आणि जागतिक पर्यावरण तज्ज्ञ एकाच मंचावर येणार असून, भारताला ‘नेट झिरो’ (Zero Carbon Emission) आणि हवामान-सहनशील (Climate-Resilient) भविष्याकडे नेण्यासाठी ही परिषद एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *