Headlines

ट्रेलर अन् कारचा अपघात; 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू:सिल्लोड मार्गावर सताळा फाट्याजवळील घटना‎




फुलंब्री छत्रपती संभाजीनगर-सिल्लोड राष्ट्रीय महामार्गावरील फुलंब्री तालुक्यातील सताळा फाट्याजवळ बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. सिल्लोडकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या सिमेंटचा ट्रेलरला (एमएच ४० एके ४९०९) पाठीमागून वेगात येणाऱ्या क्रेटा कार (एमएच २० एचएन ४१००) जोराची धडक दिली. या भीषण अपघातात कारचालक चंद्रशेखर सुभाष शेवाळे (३२, रा. गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर) यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर ज्योती सतीश गायकवाड या गंभीर जखमी झाल्या आहेत. वडोद बाजार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहने सिल्लोडकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असताना सताळा फाट्याजवळ हा अपघात घडला. धडक एवढी भीषण होती की, कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला. अपघात भयंकर असल्याने गाडीतील एअरबॅग उघडूनही चालकाचा जीव वाचू शकला नाही. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ शासकीय रुग्णवाहिकेतून जखमींना सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून चंद्रशेखर याला मृत्यू घोषित केले तर ज्योती गायकवाड यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णात दाखल केले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच वडोद बाजार पोलिस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. कारचा असा चुराडा झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *