Headlines

पर्यटकांचे केंद्र:संत एकनाथ महाराज समाधी मंदिर‎परिसर सुशोभीकरण अंतिम टप्प्यात‎, 21 लाखांच्या 21 शिल्पांमधून साकारले नाथांचे जीवनचरित्र




पैठण येथील जगप्रसिद्ध श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि विकासकामे अंतिम टप्प्यात आली आहेत. नाथ संस्थानच्या वतीने सुमारे २१ लाख रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या २१ विविध शिल्पांमुळे मंदिर परिसराला अभूतपूर्व आध्यात्मिक आणि सौंदर्यात्मक रूप प्राप्त झाले आहे. या विकासकामांमुळे नाथनगरीत येणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. समाधी मंदिर परिसरात प्रवेश करताच भाविकांना एका वेगळ्याच अध्यात्मिक वातावरणाचा अनुभव मिळतो. देशभरातून पैठण येथे येणाऱ्या वारकरी आणि पर्यटकांसाठी ही शिल्पे विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. यापूर्वी मंदिर परिसरात नाथांच्या जीवनचरित्रावर आधारित तैलचित्रे लावण्यात आली होती, आता त्यात या कलात्मक शिल्पांची भर पडली आहे. नव्या पिढीला नाथांच्या विचारांची आणि कार्याची ओळख होण्यासाठी ही शिल्पे अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहेत. पैठण हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिर परिसराचे सौंदर्य वाढण्यासोबतच भाविकांना नाथांचा इतिहास सहज समजेल, या दृष्टीने हे काम लक्षवेधी ठरत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र बोरकर यांनी सांगितले. कीर्तन हॉलसह इतर संत एकनाथ महाराज समाधी मंदिर परिसराला शिल्पांमुळे अभूतपूर्व आध्यात्मिक रूप प्राप्त झाले आहे. नाथांची शिल्पे भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देणारी समाधी मंदिर परिसरात उभारण्यात आलेली ही शिल्पे भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देणारी आहेत. नाथांच्या जीवनकार्याचा संदेश अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचण्यास यामुळे मोठी मदत होईल. – विलास भुमरे , आमदार पैठण, अध्यक्ष, नाथ संस्थान नाथांचे वारकरी परंपरेतील योगदान शिल्पांच्या माध्यमातून भाविक, पर्यटकांना दिसेल समाधी मंदिराकडे जाणाऱ्या सुमारे ५०० मीटरच्या मुख्य रस्त्यावरील दुभाजकात संत एकनाथ महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक प्रसंग शिल्परूपात साकारण्यात आले आहेत. नाथांचे जीवनकार्य, त्यांनी दिलेला सामाजिक समतेचा संदेश आणि वारकरी परंपरेतील त्यांचे योगदान या शिल्पांच्या माध्यमातून प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभे राहत आहे. पायाभूत कामेही पूर्णत्वाकडे असून, या सुशोभीकरणामुळे पैठणच्या धार्मिक पर्यटनाला एक नवी आणि समृद्ध ओळख मिळत आहे. नाथ मंदिर परिसरात विविध विकास कामे झाली आहेत. यामुळे वारकरी, भाविक भक्तां सह येथे पर्यटक देखील वाढले आहेत. शहादेव लोहारे नाथ भक्त पैठण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *