![]()
नीरा उजवा कालवा विभागातील पाण्याच्या आवर्तनाला राजकीय हस्तक्षेप, मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा आणि बेसुमार पाणी चोरीचा फटका बसला आहे. एकीकडे तिसंगी तलाव अद्याप कोरडाठाक पडलेला असताना दुसरीकडे कालव्यातून सोडलेले पाणी अपेक्षित गतीने पुढे सरकत नसल्याने लाभक
.
डिझेल अनुदान नाही म्हणून झाडा-झुडुपांनी कालवा पोखरला नीरा उजवा कालव्याचे सुमारे २० वर्षांपूर्वी अस्तरीकरण झालेले आहे. कालव्याच्या दोन्ही बाजूनी प्रचंड प्रमाणात झाडे, झुडपे वाढलेली आहेत. डिझेल अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे यंत्रसामग्री असूनही कालव्यातील झाडे, झुडपे आणि अडथळे काढण्याचे काम ठप्प झाले आहे.
नीरा उजवा कालवा विभागाकडे प्रचंड कमतरता आहे. क्षमतेच्या आणि गरजेच्या केवळ २५ टक्के कर्मचारी उपलब्ध आहेत. एकूण आवश्यक ८० कर्मचाऱ्यांपैकी प्रत्यक्षात केवळ २० कर्मचारी कार्यरत आहेत. पाण्याचे आवर्तन सुरळीत पार पाडण्यासाठी ४० पाटकऱ्यांची गरज असताना फक्त १५ पाटकरी उपलब्ध आहेत, आणि या पैकी ४ महिला कर्मचारी आहेत.
२५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत पाणी सोडणार सध्या पावसाअभावी उभ्या पिकांना पाणी द्यावे लागत असले, तरी प्रशासनाकडून २५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत नीरा उजवा कालवा पूर्ण क्षमतेने चालवण्याचे नियोजन आहे. या काळात तिसंगी तलाव जास्तीत जास्त भरून घेतला जाईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.