Headlines

आईची मोलमजुरी, वडिलांचा बँड‎अन् मुलाची एमपीएससीत भरारी‎:कोंढवडच्या अभिषेकचे मुद्रांक निरीक्षक पदासाठी सहावे स्थान




राहुरी परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्द, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते, हे राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील अभिषेक सिताराम चव्हाण यांनी सिद्ध केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मुद्रांक निरीक्षक पदासाठी जाहीर झालेल्या शिफारस पात्र उमेदवारांच्या यादीत त्यांनी अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गातून २७३.५० गुण मिळवत सहावे स्थान पटकावले. त्यांच्या या यशामुळे क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न साकार झाले आहे. अभिषेक यांचे वडील सिताराम चव्हाण हे बँड वाजवून उदरनिर्वाह करतात, तर आई रत्नमाला चव्हाण मोलमजुरी करून संसाराला हातभार लावतात. आर्थिक अडचणी आणि मर्यादित साधनांवर मात करत अभिषेक यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. आजोबा मारूती चव्हाण व आजी गयाबाई चव्हाण यांच्या संस्कारांचीही त्यांना भक्कम साथ मिळाली. अभ्यासाचे योग्य नियोजन, सातत्य आणि ध्येयावर अढळ विश्वास ठेवत त्यांनी परीक्षेची तयारी केली. अखेर मेहनतीला यश मिळाल्याने चव्हाण कुटुंबाच्या संघर्षाला अभिमानाची किनार लाभली. अभिषेक चव्हाण यांचा सन्मान करतांना आ.अक्षय कर्डिले व पत्रकार विनीत धसाळ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *