Headlines

राज्यात लवकरच तीस हजार शिक्षकांची भरती:नाशिकमध्ये शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेंची घोषणा




“महाराष्ट्रात गुणवत्तेला प्राधान्य देत टीएटी आणि “पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून लवकरच ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली. या भरतीमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांना संधी मिळण्यासोबतच कला, क्रीडा आणि माजी सैनिकांसाठी विशेष जागा राखीव ठेवल्या जातील तसेच शिक्षकेतर कर्मचारी भरतीचे अधिकार संस्थांना दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा विद्या प्रसारक समाज (मविप्र) संस्थेच्या वतीने कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त आणि आद्य संस्थापकांच्या स्मरणार्थ आयोजित “समाजदिन व गुणगौरव सोहळ्यात’ प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. गंगापूर रोड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात बुधवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सीबीएससीमध्ये शिवरायांचा २२ पानांचा इतिहास शिक्षणातील बदलांवर बोलताना शिक्षणमंत्री म्हणाले, “केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सीबीएससी आणि इतर बोर्डांच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्वीच्या अवघ्या दीड कॉलमऐवजी आता २२ पानांचा समाविष्ट करण्यात आला आहे. इयत्ता पहिली ते १२ वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात ७० मानबिंदूंचा इतिहास, सोबत थोरांची ओळख विद्यार्थ्यांसमोर मांडली जाईल, असेही त्यांनी सांगितले. महत्त्वाच्या घोषणा व सूचना



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *