![]()
मतदार यादी पुनरीक्षणासाठी राज्यात १ लाख ३६ हजार बूथ असून आतापर्यंत भाजपचे ९३ हजार बीएलए नियुक्त आहेत. अद्याप ४३ हजार बीएलएंची नियुक्ती बाकी असून ही चालढकल चालणार नाही, असा सज्जड दम देत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी नाशिकमधील विभागीय बैठकीत पदाधिकाऱ्यांना फटकारले. बूथबाहेर बसून निवडणुका जिंकता येत नाहीत. मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे, बूथवर सक्षम यंत्रणा उभी करत ताकदीने लढावे, असे निर्देश चव्हाण यांनी या वेळी दिले. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी नाशिक पंचवटीतील स्वामीनारायण मंदिरात पार पडली. बैठकीस तरुण चुघ, किरीट सोमय्या, डॉ. भारती पवार, मंत्री गिरीश महाजन, पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने बूथ बांधणीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. महायुतीच्या जागावाटपापूर्वीच भाजप संघटनात्मक ताकद वाढवण्याचे ठरवले आहे. संघटन कमकुवत तेथेच बैठकीतून यंत्रणा सक्रिय संघटनात्मक काम बाकी असलेल्या मतदारसंघांत आढावा बैठका होतील. २४ तारखेनंतर निवडणूक लढण्यासाठीची कार्यकारिणी आणि बूथस्तरावरील यंत्रणा सक्रिय करण्यावर भर दिला जाणार आहे. निवडणुकांसाठी मजबूत यंत्रणेची गरज व्यक्त प्रक्रियेत कुठे कमी पडतोय, हे लक्षात घेऊन काम करा. निवडणूक जिंकण्यासाठी केवळ सभा पुरेशा नसून बूथवर मजबूत यंत्रणा अत्यावश्यक आहे. कार्यकर्त्यांनी संघटनात्मक कमतरता ओळखून तातडीने काम करण्याची गरज असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
Source link
भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी बीएलएच्या नियुक्तीवरून पदाधिकाऱ्यांना फटकारले:नाशिक येथे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक