![]()
पुण्यातील मुंढवा परिसरात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून ॲड. संजय सावंत याने आपल्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीच्या मदतीने महिला सेक्रेटरीचा क्रूरपणे खून केला. पूनम दिनेश मुन (वय 35) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी सावंत कुटुंबातील तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी आता मृत पूनम मुन यांचे पती दिनेश मुन यांनी या घटनेची इन्साइड स्टोरी सांगितली आहे. दिनेश मुन म्हणाले, रोजच्या प्रमाणेच माझी बायको 2 वाजता ऑफिसला गेली आणि सव्वा तीन वाजता ऑफिसला पोहोचते. मला तिच्या साहेबांचा फोन आला मॅडम ऑफिसला आल्या नाहीत, काही अपडेट आहे का? मी म्हटले की त्यांना फोन लावून बघा. त्यावर त्यांनी सांगितले की फोन लावला पण लागत नाहीये. फोन केला तेव्हा रिंग वाजत होती, पण उचलत नव्हती पुढे दिनेश मुन म्हणाले, त्यानंतर मी फोन लावला तेव्हा फोन लागला, रिंग वाजत होती पण फोन उचलत नव्हती. 2-3 वेळा प्रयत्न करून बघितला. त्यानंतर 4 वाजता तिने मला मेसेज केला. मी तुम्हाला नंतर फोन करते. मग मला वाटले की कुठेतरी इंटरव्ह्यूसाठी गेली असेल. कारण आमचे यावर सकाळी बोलणे झाले होते. ती म्हणत होती की मी दुसरीकडे कामाला जाऊ का? त्यानंतर मी विषय टाळला होता. त्यामुळे मला वाटले की ती इंटरव्ह्यू देण्यासाठी गेली आहे. म्हणून मग तिने फोन बंद केला असेल किंवा फोन उचलत नसेल. पूनमचा फोन नॉट रिचेबल आला त्यानंतर मी पूनमला पुन्हा फोन लावत होतो, पण आता फोन लागत नव्हता. नॉट रिचेबल येत होता. मला वाटले नेहमी प्रमाणे तिचा फोन वगैरे बंद झाला असेल किंवा बॅटरी डाऊन असेल, ती रोजच्या प्रमाणे घरी येईल. मात्र ती घरी आली नाही. त्यानंतर मला थोडा संशय आला. मी 8 वाजता कामावरून निघालो, 9 वाजता घरी आलो आणि घरून तिच्या ऑफिसजवळ गेलो. तिथेच बाजूला एक टेलर आहे, त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की तुमची बायको दिसली नाही. पण वकिलांची बायको आणि मुलगी दिसली. त्या दुपारी ऑफिसला आल्या होत्या. मी पुन्हा वकिलाला फोन लावला. ते म्हणाले, तुम्ही एक काम करा, मॅडम वाघेश्वर मंदिर जवळ बसतात कधीकधी, तिथे जाऊन चौकशी करा. वकिलाल फोन केला तेव्हा त्यांनी भरकटवण्याचा प्रयत्न केला दिनेश मुन सांगतात की, मी तिथेही गेली, ती तिथेही नव्हती. तिथून पुन्हा मी वकिलाला फोन लावला तेव्हा त्यांनी विषय भरकटवण्याचा प्रयत्न केला. मग मी पोलिसांत तक्रार दाखल करतो म्हटले. त्यावर आता चौकीत जाऊन काय करणार वगैरे ते म्हणाले. लगेच जाऊ नका, जरा धीर धरा. मी त्यांचे ऐकले नाही. मी शास्त्रीनगरला गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की तुम्ही लक्ष्मी नगरला जावा. लक्ष्मी नगर पोलिस ठाण्यात जाऊन संपूर्ण माहिती दिली. त्यांनी सांगितले की तुम्ही उद्या सकाळी 10 वाजता या. मी सकाळी 10 वाजता तिथे गेलो, तेव्हा त्यांनी मला वेळ लागेल तुम्ही पुढे जाऊन चौकशी करा असे सांगितले. सीसीटीव्हीत पूनम ऑफिसला जाताना दिसली पुढे माहिती देताना दिनेश मुन म्हणाले, आम्ही येता येता विमान नगर चौकात थांबलो. विचार केला की विमान नगरला जाऊन ऑफिसमध्ये बघू. तिथे कोणाला विचारू. आम्ही तिथे सीसीटीव्ही तपासले तेव्हा दिसले की पूनम ऑफिसकडे गेली होती. मी काल ऑफिसच्या तिथे गेलो तेव्हा ऑफिसला कुलूप होते. पण दुसऱ्या दिवशी कुलूप नव्हते. मी लगेच वकिलाल फोन केला आणि सांगितले की तुमच्या ऑफिसला कुलूप नाही. तुम्ही तर म्हणाले होते की तुम्ही मी आल्यावर चावी पाठवून देतो मग ते आत्ता उघडे कसे? मी त्यांना विचारले खोलून बघू का विचारले, ते मला म्हणाले हो बघा. मी ते ओपन करून आत गेलो तर आतमध्ये पूर्ण अंधार होता. फॅन चालू होता. जवळच मच्छर मारायची बॉटल होती त्याच्यावर रक्ताचे डाग होते. ऑफिसमध्ये गोण्या अंथरलेल्या होत्या आणि रक्ताचे डाग दिनेश मुन यांनी पुढे सांगितले की, मी थोडा अजून आतमध्ये गेली, तिथे मला गोण्या अंथरलेल्या दिसल्या. दगड होता. मला वाटले काहीतरी काम चालू असेल. त्यानंतर मला पुन्हा एकदा फरशीवर आणि भिंतीवर रक्त दिसले. त्यानंतर मग मला संशय आला की माझ्या बायकोसोबत काहीतरी घडले आहे. मी लगेच लक्ष्मीनगर पोलिसांना फोन केला. ते म्हणाले 112 नंबरला फोन करा. चंदननगरचे पोलिस आले, त्यांनी संपूर्ण तपास केला. त्या सगळ्या गोण्या काढल्या तिथे बायको होती माझी. त्यांनी ओळख पटवली तेव्हा मी सांगितले की ही माझी बायको, पूनम आहे. मी त्यानंतर वकिलाल फोन केला, तर त्याने असे दाखवले की आपल्याला यातले काहीच माहीत नाही. तो म्हणाला, मी मुंबईत आहे, मी पुण्याला येतोच आहे. त्यानंतर रात्री त्याच्या बायकोला आणि मुलीला अटक करण्यात आली, अशी माहिती दिनेश मुन यांनी दिली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पूनमला बॅटीने बेदम मारहाण करण्यात आली होती पूनम मुन या गेल्या साडेतीन वर्षांपासून ॲड. संजय सावंत यांच्या मुंढवा येथील कार्यालयात साहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. सावंत यांचे पूनम यांच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीची पत्नी स्वाती सावंत हिला होता. याच कारणावरून गुरुवारी (16 एप्रिल) कार्यालयात वाद झाला. संतापलेल्या संजय सावंत, पत्नी स्वाती आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीने पूनम यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पूनम यांचे पाय दोरीने बांधून त्यांच्यावर क्रिकेटच्या बॅटने सपासप वार करण्यात आले. या भीषण हल्ल्यात पूनम यांचा जागीच मृत्यू झाला.
Source link
ऑफिसमध्ये फरशीवर गोण्या अन् भिंतीवर रक्ताचे डाग:माझ्या बायकोची बॉडी…; मृत पूनमच्या पतीने सांगितली इन्साइड स्टोरी