![]()
पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गेल्या दोन वर्षांपासून घडत होती. या प्रकरणी एका २२ वर्षीय तरुणाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, संजय अनंता भालेराव, शिवानंद बाळासाहेब पाटील (दोघे रा. कर्वेनगर), अमित दारवटकर, आनंद लोंढणवार आणि अमित सुहास देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण खडकवासला परिसरातील नांदोशी गावात राहणारा आहे. आरोपींनी त्याला आणि इतर काही तरुणांना महापालिकेत सेवक, पर्यवेक्षक, हवालदार अशा विविध पदांवर नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या आमिषाने आरोपींनी गेल्या दोन वर्षांत तक्रारदारासह अन्य तरुणांकडून एकूण ६७ लाख रुपये घेतले. मात्र, पैसे घेतल्यानंतरही त्यांनी कोणालाही नोकरी दिली नाही. नोकरी न मिळाल्याने तरुणांनी आरोपींकडे विचारणा केली असता, त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारासह इतर तरुणांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंके करत आहेत. इलेक्ट्रिकल्सच्या गोदामातून पावणेदोन लाखांचे साहित्य चोरीला वडकी येथील शिल्पा इलेक्ट्रिकल्सच्या गोदामाचे लॉक बनावट चावीने उघडून चोरट्याने एक लाख ६६ हजार ८०० रुपयांचे इलेक्ट्रिकल साहित्य चोरून नेले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मल्लिनाथ कासन्ना कुंभार (वय ४०, रा. समर्थ प्रसाद बिल्डिंग, मानाजी नगर, नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,काल रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पुणे-सासवड रस्त्यावरील तेजोमय लॉन्सच्या मागे असलेल्या गोदामात चोरी झाली. चोरट्याने गोदामाच्या दरवाजाचे लॉक बनावट चावीने उघडले. त्यानंतर गोदामातील कॉपर स्क्रॅप वायर, ब्रास इम्पेलरचे एक हजार २०० नग आणि एक सबमर्सिबल पंप असे साहित्य चोरून नेले. फुरसुंगी पोलिस अधिक तपास करत आहेत.
Source link
पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 67 लाखांची फसवणूक:सिंहगड रस्ता पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला