Headlines

लासूर स्टेशनच्या बाजारात ‘थार’मधून कांदा विक्रीसाठी; 3,605 रुपये भाव:180 किलो कांदा आणला, चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांतून समाधान‎




लासूर स्टेशन मराठवाड्यातील प्रसिद्ध लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी झोडेगाव येथील शेतकरी योगेश पडोळ यांनी चक्क थार गाडीतून कांदा विक्रीसाठी आणल्याने ही अनोखी आवक परिसरात चर्चेचा विषय ठरली. कांदा बाजारात दाखल होताच व्यापारी व शेतकऱ्यांचे लक्ष वेधले गेले. पडोळ यांच्या कांदा चाळीतील या हंगामातील पहिल्याच मालाला ३ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल असा समाधानकारक भाव मिळाला. सामान्यतः कांद्याची वाहतूक ट्रॅक्टर किंवा पिकअपमधून केली जाते. या वेळी बोलताना सभापती शेषरावनाना जाधव म्हणाले, “सध्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. शेतकऱ्यांनी कांदा स्वच्छ व दर्जेदार करून आणावा, तसेच पावसाचे दिवस असल्याने ताडपत्री सोबत ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *