Headlines

‘धनुष्यबाण’ गोठवले तर ‘भाजप’ला राजकीय लाभ:बाळासाहेब आंबेडकरांचा पत्रपरिषदेत दावा‎




शिवसेना पक्ष व ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणीचा निकाल कोणत्याही बाजूने लागला, तरी त्याचा राजकीय फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. कोर्टाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवले, तर दोन्ही शिवसेना पक्षांना स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढावी लागेल. त्यामुळे दोन्हींचे आमदार व खासदार त्यांच्या पक्षासोबत कितपत टिकतीलॽ, हा प्रश्न निर्माण होईल. त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला. शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्हाच्या वादावर गुरुवारी पत्रकार परिषदेत अॅड. आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या कायदेशीर बाजूवर प्रश्न उपस्थित केले. राजकीय पक्षांची कायदेशीर नोंदणी अनिवार्य झाल्यानंतर त्यांच्या अंतर्गत वादांवर निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नेमका किती आहेॽ, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, असे त्यांनी म्हटले. सध्याची परिस्थिती पाहता चिन्ह गोठवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास दोन्ही शिवसेनेला नव्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल.असा दावा अॅड.आंबेडकर यांनी केला. मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष १९८९ मध्ये लोकप्रतिनिधित्व कायद्यात दुरुस्ती करून कलम २९-अ अंतर्गत राजकीय पक्षांची नोंदणी अनिवार्य करण्यात आली. पक्षाच्या घटनेत केंद्रीय पातळीपासून गावपातळीपर्यंतच्या संघटनात्मक रचनेची माहिती देणे आवश्यक झाले. त्यामुळे राजकीय पक्षांना स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्राप्त झाले. यामुळे राजकीय पक्षांचे निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्रातून निघून सिव्हिल कोर्टाच्या अधिकारक्षेत्रात आले. असे असताना आयोग कसा काय िनर्णय घेऊ शकतेॽ, या प्रश्नाकडे कोणीच लक्ष देत नसल्याने भाजपला खेळ करणे सोपं झाल्याचे अॅड. आंबेडकर म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *