Headlines

संभाजीनगरच्या तरुणीचा आईकडूनच 25 हजारांत साैदा:बनावट लग्नाचा डाव, नाशिकच्या बनावट मामाने नवरदेवाकडून उकळले 2 लाख




अवघ्या २५ ते ३० हजार रुपयांत आईनेच मध्यस्थांच्या मदतीने पोटच्या मुलीचे खोटे नाव सांगून तिचे बनावट लग्न लावून दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी माधव कारभारी वाघ, अंजना राजेंद्र देवरे, राहुल गबा शेळके (सर्व रा. नाशिक) आणि पीडितेची आई शीला (रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आईने नाशिक शहरातील एका महिलेस बनावट आई आणि बनावट मामाही बनवून नवरदेवाकडील मंडळींसमोर उभे केले. नंतर बनावट मामा, बनावट आईने नवरदेवाकडील लोकांकडून २ लाख रुपये उकळले. ​खोटे नाव आणि दबाव पीडित तरुणीला स्वतःचे नाव खोटे सांगण्यास भाग पाडले आणि फसवणूक करून तिला माणगाव येथे सासरी पाठवून दिले. तेथे पोहोचल्यानंतर पीडितेला या संपूर्ण फसवणुकीची जाणीव झाली. तिने तात्काळ अमोल कदम व त्यांच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन खरी हकीकत सांगितली. कदम कुटुंबीयांनी तरुणीला कोणताही त्रास न देता तिला समजून घेतले. यानंतर तरुणीने उपनगर पोलिस ठाण्यात हजर राहून तक्रार नोंदवली. असा रचला कट मुख्य सूत्रधार माधव वाघ याने पीडितेच्या आईला २५ ते ३० हजार रुपयांचे आमिष दाखवले. अंजना देवरे हिला ‘खोटी आई’ आणि राहुल शेळके याला ‘खोटा मामा’ बनवून नवरदेवाकडील लोकांसमोर उभे केले. माणगाव ( सांगोला, जि.सोलापूर) माणगाव येथील अमोल दादा कदम आणि दादा जयवंत कदम यांच्याकडून लग्नाच्या बहाण्याने २ लाख रुपये उकळले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *