Headlines

बारामतीत दुर्दैवी घटना:आईशी भांडण अन् घर सोडलेल्या 9 वीतील विद्यार्थिनीचा मृतदेह नाल्यात आढळला




बारामती तालुक्यातील रुई गावच्या हद्दीत एका नाल्यामध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या अवनी अजित दशावतारे या विद्यार्थिनीचा मृतदेह रविवारी आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आईसोबत झालेल्या वादानंतर अवनी घर सोडून निघून गेली होती. त्यानंतर हा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. मुलीच्या मृत्यूचे अचूक कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. नेमके प्रकरण काय? प्राथमिक माहितीनुसार, अवनी आणि तिच्या आईमध्ये काही कारणांवरून वाद झाला होता. आईने रागावल्यामुळे संतप्त झालेली अवनी कोणालाही काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. ती बराच वेळ घरी परतली नाही, म्हणून कुटुंबीयांनी तिची परिसरात तसेच नातेवाइकांकडे शोधाशोध सुरू केली. मात्र, तिचा शोध लागला नाही. दरम्यान, रविवारी (24 ऑगस्ट) बारामती तालुक्यातील रुई गावच्या हद्दीत असलेल्या एका नाल्यामध्ये एका मुलीचा मृतदेह तरंगताना स्थानिक नागरिकांना आढळला. त्यांनी या घटनेची माहिती तातडीने बारामती तालुका पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह नाल्यातून बाहेर काढला. त्यानंतर पडताळणी केली असता तो मृतदेह बेपत्ता असलेल्या नववीतील विद्यार्थिनी अवनी दशावतारे हिचाच असल्याचे निष्पन्न झाले.

हे ही वृत्त वाचा पुण्यात अमली पदार्थ देऊन तरुणीवर सामूहिक अत्याचार:मारहाण अन् जिवे मारण्याची धमकी देत शिरूरच्या लॉजमध्ये डांबून ठेवले, 7 जणांवर गुन्हा दाखल
पुण्यातील शिरूर शहरात एका 22 वर्षीय तरुणीवर अमली पदार्थ देऊन सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून तरुणीला एका लॉजमध्ये डांबून ठेवण्यात आले आणि जबरदस्तीने अमली पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 22 वर्षीय तरुणी ही मूळची छत्तीसगड येथील रहिवासी असून ती सध्या पुण्यात चाकण परिसरात वास्तव्यास आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *