Headlines

जरांगेंचा इशारा, मराठे मुंबई गाठणार; हालचालींना वेग:मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहणी




मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला असून या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय आणि सामाजिक हालचालींना वेग आला आहे. येत्या २९ ऑगस्टपासून जरांगे पाटील यांचे पुन्हा उपोषण सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समन्वयक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी मुंबईच्या आझाद मैदानाची पाहणी करून संभाव्य आंदोलनाची पूर्वतयारी सुरू केली आहे. मागील आंदोलनात पावसामुळे झालेला चिखल, व्यासपीठाची जागा आणि माध्यमांच्या प्रतिनिधींना पडलेली जागेची कमतरता या त्रुटींवर मात करण्यासाठी यंदा विशेष नियोजन केले जात आहे. तसेच येण्या-जाण्याचा मार्ग कसा असेल याची चाचपणी करण्यात आली. २९ ऑगस्टपासून उपोषणाला सुरुवात होणार आहे. उपोषण आंतरवाली सराटीत होणार की मुंबईत, याबाबत मनोज जरांगे पाटील अंतिम निर्णय उर्वरित. स्पोर्ट्‌स ‘ डॅमेज कंट्रोल’ रणनीती मुंबईत आझाद मैदानाची पाहणी करून मनोज जरांगे यांनी सरकारवर दबाव वाढवला आहे, तर आंतरवालीचा पर्याय ठेवून रणनीतिक लवचिकता राखली आहे. छगन भुजबळ यांची वक्तव्ये आणि समता परिषदेची बैठक ही ओबीसी मतपेढी टिकवण्याची धडपड दर्शवते. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांची मध्यस्थी ही दोन समाजांतील संभाव्य जातीय तणाव रोखण्यासाठी सरकारची राजकीय ‘डॅमेज कंट्रोल’ रणनीती दिसून येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *